वाजंत्री, वरात घोडा… लगीनघाई सुरू झाली राणादाला अंजलीची हळद लागली..
छोटया पडद्यावरील सर्वांची लाडकी जोडी राणादा आणि अंजली बाई ही जोडी अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत.राणादा व पाठकबाई या पात्राची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. तर आता या जोडीचा ऑफ स्क्रीन लग्न सोहळा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आणि आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. याचवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. आणि आता हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. तर त्यांच्याघरी सुरू असणाऱ्या विधींचेही फोटो समोर आले आहेत.
दरम्यान, नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपल्या लाडक्या राणा दा अर्थात हार्दिकला हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. सोशल मीडियावर शेयर होत असलेल्या या व्हीडिओ मध्ये दिसत आहे की, त्याच्या घरी हळदी समारंभाची धूम माजली आहे. यावेळी सगळे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित आहेत. सोबतच हार्दिकचा मित्र व अभिनेता अमोल नाईकने हार्दिकच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
लगीनघाई सुरू झाली आहे आणि आता हार्दिकला अक्षयाच्या नावाची हळद लागली आहे. हार्दिकने त्याच्या हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे. तसेच त्याने मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहे. हळदी कार्यक्रमासाठी हार्दिकच्या घरी छान डेकोरेशन करण्यात आले आहे. त्याचा मित्र अमोल नाईक हा अनमोल क्षण टिपत डान्स करून हा आनंद साजरा करत आहेत. तर हळद लागलेले फोटोज् शेयर करत हार्दिक देखील आनंद व्यक्त करतो आहे.
View this post on Instagram
हळदीच्या या कार्यक्रमासाठी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच हार्दिक व अक्षया असे नावही खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. सोबतच कुटुंबियांसह मित्र-मंडळीही हार्दिकची हळद एन्जॉय करताना दिसत आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हार्दिक-अक्षयाच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे, हार्दिकच्या पोस्ट केलेल्या एका स्टोरीवरुन त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली. हार्दिकच्या एका मैत्रिणीनेही त्याच्या केळवणाचा फोटो शेअर केला होता, तोच हार्दिकनेही रिपोस्ट केला. दरम्यान या फोटोमध्ये तिने #6daystogo असा हॅशटॅग वापरला.. हार्दिकने पोस्ट केलेल्या फोटोमधील हॅशटॅगनंतर येत्या १ किंवा २ डिसेंबरला ही जोडी लग्नबंधनात अडकेल असा अंदाज नेटकरी बांधण्यात आला होता. त्यामुळे समोर आलेल्या या व्हिडीओ मुळे हे स्पष्ट होत आहे की आता हे लग्न लवकरच पार पडेल आणि चाहत्यांना त्यांच्या लाडक्या जोडीचा लग्नसोहळा पहायला मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचे लग्न पुण्यात होण्याची शक्यता आहे.