“चालतंय की” या एका डायलॉगने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारा मराठमोळा नट म्हणजे राणा दा अर्थात हार्दिक जोशी.. झी मराठी वाहिनीवरील
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी राणा दा बनून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. खर तर याच मालिकेमुळे त्याला ओळखीसोबतच लोकप्रियता देखील मिळाली. मालिकेत राणादा या त्याने साकारलेल्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. दरम्यान आता छोटया पडद्यासह तो आता मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात हार्दिक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने नुकतंच झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली. सुबोध भावे या शोचं अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान, हार्दिकने या शोमध्ये अनेक गमतीदार किस्से सांगितले. यावेळी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या आठवणीही सांगितल्या. सुबोधने त्याला “पैलवान असण्याचे काही तोटे आहेत का?”, असा प्रश्न विचारला. त्यावर त्याचे उत्तर ऐकून सुबोधच काय तर सारे चाहते देखील चाट पडले.
View this post on Instagram
सुबोधच्या या प्रश्नाला उत्तर देत हार्दिक म्हणाला, “नाही. पैलवान असण्याचे कोणतेही तोटे नाहीत. पण आमचा आहार फार मोठा असतो. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका सुरू होती तेव्हाही माझा आहार दणकट असायचा. मी दिवसाला २५ अंडी, एक लिटर दूध किंवा एक किलो चिकन, मटण खायचो. आणि सलग पाच वर्ष मी असा आहार घेतला आहे. त्यामुळे जेवताना माझ्या बाजूला कोणीही बसायचं नाही. मालिकेसाठी मी २५ दिवसांत २३ किलो वजन वाढवलं होतं.
दरम्यान, तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे हार्दिकला ओळख तर मिळाली शिवाय त्याची सहचारिणी देखील मिळाली. अभिनेत्री अक्षया देवधरने मालिकेत पाठक बाईंची भूमिका साकारली होती. राणादा-पाठक बाई या जोडीचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान आजही कायम आहे. अक्षया आणि हार्दिक लवकरच विवाहबंधनात अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
त्यांची लगीन घाई सुरू झाली आहे. आणि नवनवीन अपडेट्स समोर येतच असतात. मध्यंतरी अक्षया साठी हार्दिक ने हात मागावर पैठणी विणली. याचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला होता. पहिल्यांदाच हातमागावर साडी विणण्याचा अनुभव घेतल्याने त्याच्या चेहऱ्यावर याचा आनंद दिसून आला. त्यामुळे अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची सगळ्यांना खूप उत्सुकता लागली आहे.