‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत होणार मोठ्या शंकर महाराजांचे दर्शन.. हा अभिनेता साकारणार भूमिका..

छोट्या पडद्यावरील अलीकडे धार्मिक मालिकांची रेलचेल वाढलेली पहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर माऊली, गाथा नवनाथांची अशा जबरदस्त शोज सोबत ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेने देखील लोकप्रियता मिळवली आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या या थोर संतांबद्दल अचूक आणि मार्मिकतेने दाखवण्यात आलेला मालिकेतील शंकर महाराजांच्या बालपणापासून सुरु झालेला हा प्रवास चाहत्यांना भावला आहे.

या प्रवासात मालिकेच्या निर्मात्यांनी लहानपणी केलेल्या लीला, शंकर महाराज आणि त्यांच्या आई – वडिलांचे नाते, त्यांचे बालपण कसे होते, आणखी कोणकोणती माणसं महाराजांच्या मार्गात आली हे सगळं उत्तमरीत्या मांडले आहे. त्यानंतर महाराजांनी कालांतराने जनकल्याणासाठी,आपले कार्य पूर्ण करण्याकरता गाव सोडले. याच प्रवासात महाराजांच्या लीला त्यांच्या भक्तांना पहायला मिळाल्या.

आणि ही आता मालिका एका महत्वपूर्ण वळणावर येऊन ठेपली आहे.सध्या मालिकेत आरुष प्रसाद बेडेकर यानं ‘योगयोगेश्वर जय शंकर’ प्रमुख भूमिका साकारली आहे.पण आता लवकरच मालिकेत मोठे शंकर महाराज पहायला मिळणार आहेत.बातमी समोर येत आहे की, मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मालिकेचे लेखक शिरीष लाटकर म्हणाले, “एक लेखक म्हणून मला असं वाटतं की ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही मालिका आता एका नव्या आणि रोचक वळणावर आली आहे.श्री शंकर महाराज यांच्या दिव्य प्रवासातला महत्वाचा टप्पा सुरु होतो आहे.या प्रवासात शंकर महाराजांनी अक्कलकोट, सोलापूर आणि पुणे इथे वास्तव्य केलं.अनेक अलौकीक लीला केल्या, भक्तांना जीवन जगण्याची एक आदर्श रीत घालून दिली .. त्या सगळ्याचं समग्र दर्शन या मालिकेतून घडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

आपल्या अस्तित्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चैतन्य फुलवणारे शंकर महाराज मालिकेत आता लवकरच मोठ्या रुपात दिसणार आहेत.यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शंकर महाराज हे असे संत आहेत जे एकाचवेळी महाराष्ट्रातचं नव्हे तर उत्तर प्रदेशात, देशाच्या बाहेर, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करत. त्यांनी त्याठिकाणी ज्या लीला केल्या, भक्तांना जी प्रचिती आली ते मालिकेत मिळणार आहे. महाराष्ट्रामधील महाराजांचे परिचित रूप दिसणार आहेच पण त्या व्यतिरिक्त त्याच काळामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी कसे वावरत होते, कुठल्या नावाने राहात होते हे सगळं बघायला मिळणार आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यांचे जीवनचरित्र या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. “

यावरून आपल्याला कळलेच असेल की अभिनेता संग्राम आता शंकर महाराजांच्या रुपात चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप