झुपकेदार केसांमुळे च मिळाली गुगल ची अ‍ॅड.. गौरवने सांगितला आठवणीतला एक किस्सा..

कलर्स मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजात्रा फेम अभिनेता गौरव मोरे त्याच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो. त्याच्या कॉमिक टायमिंग आणि अनोख्या शैली मुळे चाहते अगदी लोट पोट होऊन हसतात. याच शो मुळे आज गौरव घराघरात पोहोचला आहे. गौरवचं सोशल मीडियावर फॅन फॉलोविंगही भरपूर आहे.फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळख असलेल्या गौरवने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिल्या होत्या.गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याची स्टाइल आणि विशेष म्हणजे झुपकेदार केस प्रेक्षकांना प्रचंड भावतात.

अलीकडेच त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने ‘एबीपी वाहिनी’च्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत कलाकारांनी हास्यजत्रेच्या पडद्यामागचे अनेक किस्से शेअर केले. या मुलाखतीत गौरवला त्याच्या झुपकेदार केसांबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “तू असे केस का वाढवले आहेस?”, असा प्रश्न त्याला विचारला गेला.“या झुपकेदार केसांमुळेच मला गुगलची अ‍ॅड मिळाली. तुमचा लूक खूप छान आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर मला पुढे लूकमुळेच काम मिळत गेलं”, असंही गौरवने सांगितलं.

तो पुढे म्हणाला, “प्रसाद खांडेकरबरोबर मी पहिल्यापासूनच काम करत होतो. पण हास्यजत्रेमुळे मला खरी ओळख मिळाली. सोनी मराठी टीम, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर यांच्यामुळे मी मोठा झालो”.आज मी जो काही आहे तो यांच्यामुळेच आहे. यांना मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्यांचा मी खूप मोठा ऋणी आहे”, असंही गौरव म्हणाला.

दरम्यान, गौरव लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो नुकताच लंडनला जाऊन आला. याआधी तो ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता.

लंडनला गेला असताना त्याच्या मनामध्ये काय भावना आहेत याबाबत आता गौरवने खुलासा केला आहे.“मी माझ्या कुटुंबातील व चाळीमधील परदेशामध्ये आलेला पहिला व्यक्ती आहे याचा मला अभिमान वाटतो. अजूनही मी पवई येथील झोपडपट्टीमध्ये माझ्या कुटुंबाबरोबर राहतो.”“मी आता अभिनेता आहे, माझे चाहते आहेत म्हणून याचा अर्थ असा नाही की मी जिथे राहतो ती जागा विसरेन.”“चाळीमध्ये राहणारे माझे शेजारी कधी-कधी तर मला व्हिडीओ कॉल करतात. तसेच लंडनमधील परिसर दाखवण्यास सांगतात. मीही त्यांना लंडनमधील फोटो पाठवतो असतो.”लंडनचे फोटो तसेच व्हिडीओ कॉल झाल्यानंतर तेही खूश होता. त्यांचा आनंद पाहून मलाही फार आनंद वाटतो.”

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप