‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जिजी अक्का यांचे पती देखील आहेत उत्कृष्ट अभिनेते.. या मालिकेत केले आहे काम..

0

मालिकेतील शुभम आणि कीर्तीच्या भूमिकेईतकीच जिजी आक्कांची भूमिका देखील प्रचंड गाजली. ही भूमिका अदिती मूलगुंड देशपांडे यांनी साकारली आहे. जिजी अक्का काहीशी काटेरी फणसाप्रमाणे आहे. मुलगा शुभम आणि सून कीर्ती यांच्यावर माया करणारी आणि प्रसंगी कानही धरणारी ही जिजी अक्का. कीर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर, तर शुभमची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी साकारत आहे.

अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी जिजी अक्काची भूमिका उत्कृष्ट पद्धतीने निभावली आहे.फार कमी लोकांना माहित आहे की, अदिती देशपांडे यांचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांच्या सासूबाई देखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

अभिनेत्री सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे यांचा मुलगा निनाद देशपांडे हे देखील बालपणापासूनच अभिनय सृष्टीत कार्यरत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेत   अनघाच्या वडिलांची म्हणजेच प्रदीप दादांची भूमिका साकारणारे दुसरे तिसरे कोणीही नसून खुद्द निनाद देशपांडे आहेत.  अभिनेते यतीन कार्येकर आणि निनाद देशपांडे हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत हे खूप कमी जणांना माहीत आहे. सुलभा देशपांडे यांचे संपूर्ण कुटुंबच कला क्षेत्राशी निगडित आहे. त्यांची थोरली बहिण ज्योत्स्ना कार्येकर या देखील हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. यतीन कार्येकर हा त्यांचाच मुलगा आहे.

सुलभा देशपांडे यांनी शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात साकारलेली बेणारे बाईंची भूमिका लोकप्रिय झाली होती. सखाराम बाईंडर, दुर्गा झाली गौरी, बाबा हरवले आहेत यासारखी काही नाटकंही त्यांनी केली. याशिवाय जैत रे जैत, भूमिका, विजेता, इजाजत, सलाम बॉम्बे अशा अनेक हिंदी मराठी कलाकृतींमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा केल्या आहेत.

दरम्यानच्या काळात अदिती देशपांडे यांनी आपला मोर्चा हिंदी मालिकांकडेही वळवला होता. पेहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, मै मायके नही जाऊंगी यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर त्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील तिने सारकलेली जिजी अक्का आज घरघरात आवडीने पाहिली जाते. आपल्या मालिकेतील भूमिकेबद्दल सांगताना आदिती म्हणते, आयुष्यात शिस्त हवी. तुम्ही चांगलं माणूस असणं खूप गरजेचं आहे. खोटं बोलणं, वागणं हेदेखील मला आणि माझ्या पात्राला आवडत नाही. पण जीजी अक्का जेवढी कडक दाखवली आहे तेवढी मी अजिबात नाही.

अभिनयाचा वारसा असणाऱ्या घरात राहत असल्याने साहजिक अभिनय हा त्यांच्या रक्तातच आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप