प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटीलचे घर नक्की कुठे? कोल्हापूर की धुळे? लगेचच जाणून घ्या

गौतमी पाटील हे नाव सध्या चर्चेत असलेलं नाव आहे. गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून नेहमीच टिका होत असतात. जरी तिच्यावर टीका होत असल्या तरीही तिचे सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या तितकीच मोठी आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते.

गौतमीचे नाव सर्वात प्रथम राज्यभर चर्चेत आलं ते सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमामुळे! सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. या गर्दीत एकाचा मृत्यू झाला होता. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता.गौतमी ही पुण्याची किंवा कोल्हापूरची आहे, असे अनेकांना वाटते मात्र तिचा जळगाव व धुळे जिल्ह्याशी जवळचा संबंध आहे. 

गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यातील असून अनेक जणांचा ती कोल्हापूरची असल्याचा अनेकांना गैरसमज आहे. मात्र, तिनेच एका पत्रकार परिषदेत कोल्हापूरची नसून धुळ्याची असल्याची माहिती दिली होती.

तिच्या नृत्यावरून सुरू झालेला वाद अद्याप ही ताजा असतानाच गौतमी पाटीलला थेट खान्देश कन्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. गौतमी पाटील ही संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असली तरी ती मूळची धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करून घर चालवायची. या काळात गौतमीच्या आईचा अपघात झाला यामुळे घरची जबाबदारी गौतमीवर आली. गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करुन घरचा उदरनिर्वाह करण्याचा तिने निर्णय घेतला.म्हणून खान्देशात एका भव्य कार्यक्रमात गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करण्यात आला होता.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिनं माजी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानत तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेयर केली होती.त्यापोस्टमध्ये तिनं “माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश!” असं म्हटलं होत.

सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून करणारी गौतमी आज आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम महाराष्ट्रात लोकप्रिय झाली आहे. ‘गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो’च्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये गौतमीचे लावणीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. जो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी पाहायला मिळते.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप