एका डान्स साठी इतके मानधन घेते गौतमी पाटील..आकडा ऐकून हैराण व्हाल..

0

टिक टॉक स्टार गौतमी पाटील तिच्या डान्समुळे ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. गौतमी पाटीलच्या लावणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवार कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. अशातच पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मोठी गर्दी पाहायला मिळाली. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रचंड मागणी आहे. यावेस पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे एका वाढदिवसाच्या पार्टीला गौतमी पाटीलच्या डान्स आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि बॅरिगेट्स लावण्यात आले होते मात्र गौतमीला पाहण्यासाठी चाहते बभान झाले होते. अनेक जण बॅरिगेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते.

गौतमीचा विरोध करत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या म्हणाल्या की, अशा तरुणी महाराष्ट्राची कला अश्लिलतेकडे घेऊन जात आहेत. लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी देखील गौतमीला तिच्या डान्समुळे समज दिला होता. तेव्हा सर्वांसमोर गौतमीने जाहीर माफी मागितली होती.

मात्र तरी देखील गौतमी तिचे अश्लील नृत्य करत आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.नुकतेच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समजली होती.

एका पत्रकार परिषदमध्ये गौतमी पाटीलने स्वतःविषयी खाजगी माहिती सांगितली होती. गौतमी ही मूळची धुळ्यातील सिंदखेडाची आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने छंद म्हणून नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती. अकलूज येथील लावणी महोत्सवात गौतमीने प्रथमच सहायक कलाकार म्हणून डान्स केला होता. त्यावेळी तिला तिच्या पहिल्या लावणीसाठी ५०० रुपये मानधन मिळाले होते. मात्र आता आपण शो साठी हजारो रुपयांचे मानधन घेत असल्याचे गौतमीने सांगितले आहे.

गौतमी पाटीलच्या पुढच्या २ महिन्यांचे कार्यक्रम फिक्स असतात. कार्यक्रमावर बंदी आणण्याच्या मागणीनंतर पहिल्यांदा गौतमीचा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे कार्यक्रम रद्द करण्यात आला.

दरम्यान, एका मुलाखती दरम्यान ती म्हणाली की, लोकांना आवडतं म्हणून ते माझ्या कार्यक्रमाला येतात. महिलाही माझे कार्यक्रम बघण्यासाठी येतात. माझ्याबरोबर त्या ठेका धरतात, हे पाहून मला आनंद होतो”. गौतमी नवीन वर्षात एक नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच तिचं लावणीचं हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.