गौतम गंभीरने पुन्हा इकदा धोनी-कोहलीशी वैर केले आणि म्हण्टला क्रिकेटचे सर्वात वाईट कर्णधार!

टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र, गंभीर अजूनही क्रिकेटशी जोडलेला आहे. माजी दिग्गज क्रिकेटर अनेक महत्त्वाच्या प्रसंगी समालोचन करताना दिसतो.

अलीकडेच, आशिया चषकात नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये त्याने प्रेक्षकांकडे अश्लील हावभाव केले होते. यावरही बराच गदारोळ झाला. दरम्यान, गौतम गंभीरचे एक विधान समोर आले असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचे धोनी-कोहलीशी वैर असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

गौतम गंभीरने काढले धोनी-कोहलीशी वैर! माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर त्याच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो आणि त्याची विधाने काही वेळा चाहत्यांना आवडत नाहीत. अलीकडेच, त्याने भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार निवडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एका मुलाखतीदरम्यान गंभीरने अनिल कुंबळेला एमएस धोनी, विराट कोहली, सौरव गांगुली आणि कपिल देव यांच्यापेक्षा भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवडले. माजी सलामीवीराने यापूर्वीही कुंबळेच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोनी, ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा विश्वचषक जिंकला आणि कोहली, ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटीत नंबर 1 बनली, त्यांना गंभीरने त्याच्या यादीतून वगळले.

काय म्हणाला गौतम गंभीर? विशेष म्हणजे गौतम गंभीर काही वेळापूर्वी विवेक बिंद्राच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखत देण्यासाठी गेला होता. यादरम्यान, रॅपिड-फायर राऊंडमध्ये, कोहली, धोनी, गांगुली आणि कपिल देव यांच्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर गंभीरने उत्तर देताना जे सांगितले ते आश्चर्यचकित करणारे होते. दिग्गजांकडे दुर्लक्ष करून त्यांनी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेची निवड केली. गंभीरने कुंबळेचे नाव घेताच ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. मात्र, याचे कारण त्यांनी दिले नाही.

कुंबळेचा कर्णधारपदात वाईट रेकॉर्ड आहे अनिल कुंबळे 2007 मध्ये भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. त्याने 14 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले परंतु कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द काही खास नव्हती कारण यापैकी भारताने 3 जिंकले, 5 गमावले आणि 6 सामने अनिर्णित राहिले.

कुंबळेने भारतासाठी 132 सामन्यांत 619 बळी घेऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली. त्याच वेळी, अँडरसनने 2021 मध्ये मागे सोडले. सध्या माजी फिरकीपटू 403 सामन्यांत 956 बळी घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप