गौरी आणि जयदिपच्या नात्याला मिळणार नवा अर्थ, पण नव्या संकटांमुळे फिरणार का आनंदावर पाणी?

0

स्टार प्रवाह वरील मालिकांनी आता टीआरपी चार्ट वर धुमाकुळ घालत आहेत. आणि या रेस मध्ये तोडीस तोड देत आहे ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिका. या मालिकेत सध्या बऱ्याच अडचणींनंतर जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात चांगले क्षण येत आहेत.

या मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे मालिका टीआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये समाविष्ट आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय बनली आहे. साहजिक च या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. आता आगामी काळात मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

गौरी आणि जयदीप यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी घडवून आणत असते. पण त्यांच्या समजूतदारपणा आणि एकमेकांच्या प्रेमाच्या जोडीने दोघेही सगळ्या संकटांचा सामना हसत करत आहेत. आणि आता तर त्यांच्या चाहत्यांसाठी ते गोड बातमी घेऊन आले आहेत. आता या दोघांमध्ये तिसरा पाहुणा येणार आहे. त्यामुळे सर्वचजण खुश आहेत.

सध्या गौरी आई बनणार आहे. त्यामुळॆ घरात आनंदाचं वातावरण आहे. आता लवकरच शिर्के पाटलांच्या घरी गौरीचं डोहाळेजेवणाचा कार्यक्रम साजरा होणार आहे.पण याचवेळी मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

सध्या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमो मध्ये दाखवल्या प्रमाणे मालिकेच्या आगामी भागांमध्ये शिर्के पाटलांच्या घरी गौरीचं डोहाळेजेवण पार पडणार आहे.सगळे अगदी उत्साहात आणि आनंदात आहेत. पण शालिनी या आनंदात विघ्न आणण्याच्या तयारीत आहे. गौरीच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात गौरी ज्या झोपाळ्यावर बसलेली असते तोच निसटतो आणि गौरी त्यावरून खाली पडते. हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.

हा प्रसंग पाहता हे सगळं शालिनीनेच घडवून आणलं आहे, हे सर्वांना कळलेच आहे. तिने झोपाळ्याचे स्क्रू आधीच काढून ठेवलेले होते. पण आता हे गौरीच्या जीवावर बेतणार असं चित्र समोर दिसून येत आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात रंजक वळणे येणार आहेत.

या प्रसंगामुळे मालिकेला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. गौरी आणि तिच्या बाळाच्या जीवाला यामुळे काही धोका तर निर्माण होणार नाही ना? ती या घटनेतून वाचणार का ? असे प्रश्न नेटकऱ्याना पडला आहे. या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात नक्कीच मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप