आजकाल सोशल मीडियावर दर आठवड्याला नवनवीन ट्रेंड येतच राहतात, आता त्यात बालपणीचे फोटो शेअर करण्याचा नवीनच ट्रेंड आला आहे. म्हणूनच या ट्रेंडला फॉलो करत कित्येक कलाकार आपापले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात.
सोशल मीडियावर दररोज येणारे हे नवनवीन व्हायरल ट्रेंड अगदी सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्यंत अनेक जण उत्साहात फॉलो करताना दिसतात. यात सध्या एका अशाच लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे आणि विशेष बाब म्हणजे हे अभिनेत्री एका मराठीतील दिग्गज अभिनेत्याची मुलगी आहे!
View this post on Instagram
बालपणीचे फोटो शेअर करणे सगळ्यांनाच आवडत असते, त्यामुळे बरेच कलाकार त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून बालपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणीत रमण्याचा प्रयत्न करतात. म्हणून फादर्स डे असो वा मदर्स डे किंवा चिल्ड्रेन्स डे जरी असला तरीही सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटी ही त्यांच्या लहानपणीचे बालपणाचे फोटो किंवा कॉलेज जीवनातील फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. सध्या अभिनेत्री गार्गी फुले यांचा असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.
‘राजा राणीची ग जोडी’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून दररोज चाहत्यांच्या भेटीला येणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे गार्गी फुले! या मालिकेत सगळ्यांच्या आवडीची बेबी मावशी ही भूमिका गार्गी साकारत आहेत. ही गार्गी दुसरी तिसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेता निळू फुले यांची मुलगी आहे! गार्गी आपल्या सोशल मीडिया हँडलवर बऱ्याच सक्रिय असून कित्येक वेळा त्या परिवारासोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र यावेळी त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत नेटकरऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये त्या आपल्या वडिलांच्या म्हणजे निळू फुले यांच्या मांडीवर बसल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच वडील आणि लेकीचा हा गोंडस फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गार्गी फुले या देखील आपल्या वडिलांप्रमाणेच उत्तम आणि गुणी अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयाची झलक त्यांच्या मालिकांच्या माध्यमातून सर्व चाहत्यांना पाहायला मिळत असते. त्यांनी ‘तुला पाहते रे’ ‘राजा राणीची जोडी’ अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. आणि सध्या त्या साकारत असलेल्या ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेतील बेबी मावशीची भूमिका त्यांच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहे!