अखेर यश आणि अनुष्काची भेट होणार.. तीच नेहा आहे तिला आठवेल का?
छोटया पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये अनेक रंजक वळणे येत आहेत. मालिकेत अचानकपणे झालेल्या नेहाच्या मृत्यूने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. नेहाच्या अचानक जाण्याने चौधरी कुटुंबावर शोककळा परसली होती. तिच्या जाण्याचा अजाणतेपणी परी आणि यशच नाही तर आजोबा, शेफाली, समीर यांच्यावर देखील खूप परिणाम झाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी यश आणि नेहा मिथिलाला पाहण्यासाठी येत असताना जंगलात झालेल्या कार अपघातात नेहा गायब झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेतला पण अनेक प्रयत्नानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर तिचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पण आता नेहाच नव्या रूपात मालिकेत परतली आहे. यामुळे प्रेक्षकांच्या गोंधळ सुरु असताना मालिकेत आता पुन्हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मालिकेचा नवा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये आता यश आणि नेहा म्हणजेच नव्या रूपातील अनुष्का समोरासमोर येणार आहेत. प्रोमोमध्ये कंपनीची डील चालली असते तेव्हा यश तिथेच असतो. आता तिथे अनुष्का देखील येणार आहे. नेहाला समोर पाहून यशला चांगलाच धक्का बसणार आहे. यश आणि नेहाची अनेक वेळा चुकामुक झाली.
प्रेक्षकांना ते दोघे कधी समोरासमोर येणार याचीच उत्सुकता होती. पण आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. अखेर यश अनुष्काला समोरासमोर पाहणार आहे. पण अनुष्का यशला ओळख न दाखवता तशीच पुढे जाते.
View this post on Instagram
त्यानंतर यश तिच्या मागे जातो. अनुष्का गाडीत बसल्यानंतर यश कितीतरी तिच्याशी बोलतो.. नेहा तू आहेस मला विश्वास होता, मी यश नेहा मला ओळख नेहा.. पण अनुष्का मात्र त्याला एकटक पाहते. तेव्हा अनुष्काचा भाऊ बोलतो, डील हातातून गेली म्हणून तो असा वागत आहे, चल ड्रायव्हर गाडी काढ.. आता नेहमी साडी किंवा पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या नेहाला वेस्टर्न फॉर्मल्समध्ये पाहून यशला चांगलाच धक्का बसला आहे.
मालिकेत नेहाच्या जाण्यानंतर वर्षभराने चौधरी कुटुंब पूर्ण विस्कळीत झाले आहे. आणि सिम्मि यश आणि कावेरीचे लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहे. पण नेहाच्या जाण्याने परी पार कोलमडून गेली आहे. तिला खाण्यापिण्यातही स्वारस्य राहिलेले नाही.. यश परीला उत्साहित करण्याचा प्रयत्न करतो आहे.पण ती या सगळ्यातून हळूहळू बाहेर येत असताना आता पुन्हा यशच्या समोर नेहाच्या येण्याने मालिकेत मोठा ट्विस्ट नक्की येणार आहे.