अखेर ‘देवमाणूस 2 ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याजागी येणार हि नवीन मालिका..
झी मराठी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवर सध्या नवीन मालिका येण्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे जुन्या मालिकांना साहजिकच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. दरम्यान, देवमाणूस ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यामध्ये दाखवण्यात येत आहे की, सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे.
परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत
अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून, मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत.
नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेचं कथानक नेमकं काय असणार, याची झलक पाहायला मिळते आहे. यात काही गावकरी एका मुलीवर अनेक आरोप करताना दिसत आहेत. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत असल्याने तिला दुषणे दिली जात आहेत. मात्र, आपली नात शापित नसून, खुद्द देवीने तिला आशीर्वाद दिला आहे, असे तिचे आजोबा सांगतात. तर, आपण होणाऱ्या घटना सांगत नसून, जे घडणार आहे तेच सांगत आहे, असे ती मुलगी म्हणते
View this post on Instagram
सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच, या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. “सातव्या मुलीची सातवी मुलगी” १२ सप्टेंबर पासून रात्री. १०.३० वा. फक्त झी मराठीवर पाहायला मिळणार आहे..