फुलाला सुगंध मातीचा मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप… पोस्ट शेयर करत असताना कलाकार झाले भावूक..
टीआरपीच्या रेसमध्ये आजवर स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांनी नेहमीच बाजी मारली आहे. त्यापैकी एक मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. या मालिकेने नेहमीच टीआरपी चार्ट मध्ये पहिल्या पाच मालिकांमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. मालिकेतील कीर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने या मालिकेने प्रेक्षकांना दररोज ही मालिका पाहण्यास भाग पाडले. पण सध्या सोशल मीडियावर या मालिकेबाबत समोर आलेल्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच कीर्ती आणि शुभम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. दरम्यान, अलीकडेच या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. या दिवशी कलाकार आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांना निरोप देताना चांगलेच भावुक झाले. मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेयर करत चाहत्यांचे आभार मानले.
मालिकेची नायिका अर्थात सर्वांची लाडकी कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरनेही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यात ती आयपीएसच्या भूमिकेत फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत तिने एकदा शेवटचं असं म्हटलं आहे. यावर तिने स्टार प्रवाह वाहिनीलादेखील टॅग केले आहे. त्याबरोबर तिने #किर्ती, #फुलाला सुगंध मातीचा, #प्रेम असे त्यांनी लिहिले होते.
याबरोबरच मालिकेत इमिली ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुरा जोशीनेही पोस्ट शेयर केली ज्याला तिने भावूक करणारे कॅपशन देत म्हंटले आहे की, “इमिली म्हणून आजचा शेवटचा दिवस. या प्रवासात मला ज्यांनी साथ दिली त्या प्रत्येकाचे आणि माझ्या सहकलाकारांचे मी आभार मानू इच्छितो. तुम्ही सर्वजण खूपच महान कलाकार आहात. या सर्व भावनिक आणि मजेशीर क्षणांसाठी धन्यवाद. हा प्रवास कायमच माझ्या लक्षात राहिल”,
मालिकेतील कीर्ती आणि शुभमची जोडी, त्यांना घरच्यांची मिळालेली साथ यामुळे मालिका हिट झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. म्हणूनच कदाचित ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण मालिका संपणार समजताच चाहत्यांनी त्याला विरोध केला होता. प्रेक्षकांना मात्र मालिका संपायला नको आहे. या पोस्टच्या खाली प्रेक्षकांनी दुसरी मालिका संपवा पण ही नको’, ‘आम्हाला ही मालिका अजून बघ्याची आहे’, ‘वेळ बदला पण मालिका बंद करू नका’ अशा कमेंट केल्या होत्या.पण ही मालिका कधी संपणार याबद्दल काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.