कौतुकास्पद; अभिनेता अशोक सराफ यांचे हे टॅलेंट पाहून चाहते झाले थक्क, निवेदिता सराफ यांनी शेअर केला व्हिडीओ..

मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक अतरंगी भूमिका निभावून आजवर रसिकांना खळखळून हसवणारे अशोक सराफ एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांच्या अनेक हिंदी व मराठी चित्रपटातील भूमिका अजरामर झाल्या आहेत. शिवाय आजदेखील त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक मंडळी विशेष धडपड करत असतात. सोशल मीडियावर अशोक चांगलेच सक्रिय असतात, त्यांचे खूपसे फोटो व व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी नेहमीच प्रचंड उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पोस्टवर विशेष कमेंट्स आणि लाईक्स देखील येत असतात.

 

या अशोक मामांनी सुमारे ५ दशके रसिकांच्या मनावर आणि पडद्यावर अधिराज्य गाजवले आहे. एक बहुगुणी आणि बहुरूपी असा अभिनेता मिळवून ही रंगभूमी धन्य झाली आहे. त्यांच्या अनेक छटा जरी आपण पाहिल्या असल्या तरीही त्यांचे एक टॅलेंट मात्र अजून कोणाला माहिती नाही. अलीकडेच त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, व्हिडीओ मधून अशोक मामांचे एक खास टॅलेंट सर्वाना कळले आहे. या व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक करत आहेत.

“मी बहुरूपी” हे नवीन पुस्तक अशोक यांनी लिहले आहे, हे पुस्तक नुकताच प्रकाशित झाले आहे. यातून त्यांनी आपला रंगभूमीवर पार पडलेला ५० वर्षाचा प्रवास वाचकांशी शेअर केला आहे. हे पुस्तक जर आपण वाचले तर त्यांच्या बद्दल अनेक खास गोष्टी आपणाला मिळतील. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनय साकारून त्यांनी अनेक भूमिकांना जिवंत ठेवले आहे. खूपशा गमतीजमती यातुन रसिकांना कळतील, इतके सुंदर हे पुस्तक आहे. एक लेखक या नात्याने अशोक यांनी या पुस्तकाला रेखीव आकार दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

या पुस्तकामुळे अशोक मामांचे एक खास टॅलेंट समोर येत आहे, या पुस्तकावर अशोक सराफ यांनी एक मुलाखत दिली होती आणि याच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडिया आकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ हल्ली भरपूर व्हायरल झाला असून, यामध्ये आपण अशोक सराफ यांना तबला वादन करताना पाहतो. त्यांचे हे टॅलेंट पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. आतापर्यंत त्यांना पडद्यावर डान्स करताना पाहिले होते, अभिनय करताना पाहिले होते पण आता चक्क त्यांना तबला वादन करताना पाहुन अनेकजण चकित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

या व्हिडीओ वर अभिनेत्री सुकन्या मोने हिने “आईशपथ” म्हणत मामांचे कौतुक केले आहे.बहुगुणी कलाकार, मामा इज द ग्रेट, क्या बात है यांसारख्या अनेक कौतुकास्पद कमेन्ट येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, इतकेच नव्हे तर चाहते मामांना नव्याने पसंत करू लागले आहेत. त्यांची लोकप्रियता अशीच आभाळभर राहो ही सदिच्छा, त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर अवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit Np online