चाहत्यांचे लाडके सई आदित्य पुन्हा एकदा एकत्र येणार.. पारिजात फुलवणार नव्याने त्यांचे प्रेम…

0

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेने प्रेक्षकवर्गावर अशी काही जादू केली होती जी आजही कायम आहे. ही मालिका प्रचंड गाजली होती. शिवाय या मालिकेचे शीर्षक गीत देखील चांगलच लोकप्रिय झाले होते. मालिकेचा हटके विषय आणि त्यासोबत सई आणि आदित्य यांची क्युट लव्हस्टोरी यांची योग्य सांगड प्रेक्षकांना रुचली. सई आणि आदित्य यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आजही सोशल मीडियावर सई आणि आदित्यचे फॅनक्लब्स आहेत.

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी या दोघांनी सई – आदित्यची भूमिका गाजवली होती. या मालिकेच्या माध्यमातून ते दोघेही महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. मालिकेला आणि कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आजही या मालिकेचे भाग झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले जातात.

आदित्य आणि सईची जोडी प्रेक्षकांना भलतीच भावली. लहानांपासून मोठ्यापर्यंत ही मालिका पाहिली गेलीमालिका बंद झाली असली तरी या दोघांना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. म्हणूनच आता या दोघांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. चाहत्यांचे लाडके सई – आदित्य लवकरच पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. एका आगळ्यावेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी हे दोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत.

सांगितले जात आहे की, हे दोघे एका म्युझिक अल्बममध्ये एकत्र येणार आहेत. ज्याचे नाव पारिजात आहे. अद्याप’पारिजात’ बद्दल काही माहिती समोर आली नसली तरी हा म्युझिक व्हिडीओ लवकरच युट्युबवर प्रसारित होणार आहे. प्रसिद्ध गायक ह्रिषीकेश रानडे आणि अमित गुजर हे दोघे गायक असून त्यात विराजस आणि गौतमीवर हे गाणे चित्रित होणार आहे. ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.

विराजसने नुकताच ‘माझा होशील ना’ मालिका संपून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि BTS व्हिडीओ आणि त्यामागील किस्से चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहे. त्याला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट करून भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता चाहत्यांची लाडकी सई आदित्यची पुन्हा पाहायला मिळणे म्हणजे चाहत्यांसाठी  आनंदाची गोष्ट असणार आहे.

दरम्यान,विराजस कुलकर्णी शिवानी रांगोळेसोबत लग्न झाल्यापासून कायम चर्चेत असतो. तर गौतमी आणि मृण्मयी देशपांडे यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात.

Leave A Reply

Your email address will not be published.