लग्न झाल्यावरही या ४ क्रिकेटर्सनी केलं होतं अफेयर? नावे वाचून बसणार नाही विश्वास.

बॉलीवूड आणि क्रिकेट जगत या दोघांचं नातं फार जुनं आहे. त्यामुळे बॉलिवूड जगतापेक्षा क्रिकेट जगत जास्त चर्चेत असलेले दिसते. भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला त्या ४ भारतीय क्रिकेटर्सची नावं सांगणार आहोत ज्यांचा विवाह होऊनही त्यांनी बाहेर अफेअर केले होते. तसेच यातील काही क्रिकेट प्लेअरने तर त्यांच्या अफेअर मुळे त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट सुद्धा दिला होता!

 

१.विनोद कांबळी~ भारतातील महत्त्वाचा क्रिकेटपटू विनोद कांबळी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. १९९८ मध्ये विनोद कांबळीने त्याची लहानपणीची मैत्रीण नोएला लुईस तिच्याशी विवाह केला पण, त्यानंतर मात्र त्याचे मॉडेल अँड्रिया हेवीट सोबत अफेअर झाले. तिच्यासोबत देखील त्याने लग्न केले! त्यावेळी क्रिकेट मधील देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर पेक्षाही विनोद कांबळीकडे जास्त टॅलेंट असल्याची चर्चा रंगायची, पण त्याच्या विचित्र वागण्यामुळे तो अनेक वेळा भारतीय संघाबाहेर गेला होता. सुरुवातीच्या काळात भारतीय संघासाठी त्याने खूप धावा केल्या परंतु अनेकदा वादात सापडल्यामुळे त्याचा फॉर्म सुद्धा उतरला, त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. आतापर्यंत त्याने भारतीय टीमसाठी १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत.

२.मोहम्मद शमी~ भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि हसीन जहा हे ७ एप्रिल २०१४ रोजी लग्न बंधनात अडकले होते. काही वर्षांनंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. हसीन एक मॉडेल होती. त्यानंतर ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर बनली.

३.मोहम्मद अझरुद्दीन- हैदराबादचा क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याने २ लग्न केली. पहिले लग्न त्याने नौरीनशी केले जिच्यापासून त्याला दोन अपत्ये झाली. पण नंतर मात्र त्याचे बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानी सोबत अफेअर झाले. १९९६ साली संगीता बिजलानी सोबत लग्न करण्यासाठी त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.

४.जवागल श्रीनाथ~ भारताचा वेगवान गोलंदाज म्हणून जवागल श्रीनाथ ने ओळख मिळालेली. श्रीनाथने २००८ मध्ये ज्योत्स्ना सोबत विवाह केला होता, परंतु त्याचे विवाह झाला असतानाही त्याने माधवी पत्रावली नावाच्या एका पत्रकाराशी अफेअर केले होते श्रीनाथने २००३ साली झालेल्या विश्वचषकात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती. यावेळी त्या विश्वचषकात त्याने भारताच्या सलग ८ व्या विजयात मोठे योगदान दिले होते!

Leave a Comment

Close Visit uttamsheti