एकनाथ शिंदे यांचा डोंबिवलीला कॉल, ‘हॅलो..मी एकनाथ शिंदे बोलतोय’ काय असेल कारण.?

मित्रहो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे “एकनाथ शिंदे”. या नावाने धुमाकूळ घातला असून, महाराष्ट्राच्या अनेक गल्ल्या, चौक चर्चेत गुंग झाले आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि ठाण्यात ज्यांचा दबदबा निर्माण आहे ते एकनाथ शिंदे अनेक बातम्यांचे हकदार बनले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरण प्रचंड उलथापालथ झाली असून निरनिराळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली सह इतर जिल्ह्यात सुद्धा शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे शिवसैनिक एकनाथ यांच्यावर चिडून आहेत तर दुसरीकडेठाणे जिल्हा मात्र शांत आहे.

दूतर्फी धांदल सुरू असतानाच अचानक गुरुवारी एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवली मध्ये खाणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान पसरले. हा क्षण खूप भावुक करणारा ठरला आहे, कारण यावेळी “हॅलो डॉक्टर… मी एकनाथ शिंदे बोलतोय..आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे..त्यांची काळजी घ्या.. काही लागलं तर सांगा…माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती!” एकनाथ शिंदे यांनी असे संभाषण केले होते. त्यांचा यावेळचा प्रत्येक शब्द खूप काही शिकवून जातो. कार्यकर्ते हे खूप मेहनत घेत असतात, ते म्हणजेच पक्षाची ताकद असतात.

शिंदे यांनी डोंबिवली मधील खाजगी रुग्णालयात फोन लावला, कारण यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक आणि डोंबिवली मधील शहरप्रमुख असणारे राम मिराशी यांना २१ जून अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिराशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती कानावर पडताच अगदी क्षणभर देखील विलंब न करता गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट शिंदे यांनी रुग्णालयात डॉक्टरांना फोन केला. त्यांचा हा एक कॉल कार्यकर्त्यांची ताकद वाढवणारा ठरला आहे.

यावेळी त्यांनी डॉक्टरांना “आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे..त्याची काळजी घ्यावी” या शब्दात आपल्या कार्यकर्त्यांची चौकशी केली व त्याची काळजी घेण्यास सांगितले. एकनाथ शिंदे यांचा हा फोन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, अनेकजण यावर चे करत आहेत. शिवसेने मध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुळे वातावरण निराळेच निर्माण झाले असून खूपसे प्रश्न लोकांच्या मनात उमटले आहेत शिवाय राजकीय घडामोडी सुद्धा अनेक वळणे घेऊन घडत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात वेगळाच नजारा दृष्टीस पडत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सह ५० हुन अधिक कार्यकर्ते गुवाहटीला ब्लु रेडिसन या हॉटेलमध्ये स्थिरावले आहेत. त्यांची सर्वत्र प्रचंड चर्चा सुरू आहेच, दरम्यान एकनाथ शिंदे हे देखील लक्षवेधी व्यक्तिमत्त्व ठरले आहे. नवीन दिवस नवीम घटना व निर्णय घेऊन समोर उभा राहत असल्याने जनता सुद्धा खूप गोंधळात पडली आहे. आता पुढे काय घडेल हे पाहणे औत्सुक्याचे असेल. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप