सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे काय परिणाम होतात? शरीराला फायदा कि तोटा..
दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे परिणाम: आपण सर्वांनी पाणी प्यायलेच पाहिजे. पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. आपले शरीर हायड्रेटेड राहते. पोट आणि त्वचेच्या समस्यांवर पाणी पिणे फायदेशीर आहे. दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. पाणी पिणं चांगलं आहे हे माहीत असलं तरी ते कधी प्यावं हे माहीत नाही. सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिणे शरीरासाठी चांगले की वाईट? त्याचे आरोग्य फायदे आहेत की तोटे? चला शोधूया.
सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते असे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच तोंडात बॅक्टेरिया जमा होत नाहीत.
सकाळी उठल्यानंतर दात न घासता पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यांना सर्दी लवकर लागते त्यांच्यासाठी सकाळी असे पाणी पिणे फायदेशीर आहे.
सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस चमकदार आणि मजबूत होतात. तसेच तुमची त्वचा मऊ होण्यास मदत होते. यासोबतच पोटाशी संबंधित बद्धकोष्ठतासारखे आजार बरे होतात.
ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्यानेही तोंडात व्रण होत नाहीत. त्यामुळे आंबट ढेकरही येत नाही.
तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असला तरीही तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यायल्यानेही लठ्ठपणा कमी होतो.
सूचना: वरील लेखातील माहिती हि संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असून ती इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यामुळे केलेल्या दाव्यांचा ‘nponlinenews.com’ चा काहीही संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच आवश्यक आहे.