फोटोमध्ये दिसणारा हा बिग बॉस मधील अभिनेत्याला ओळखलंत का? नवा लूक पाहून सर्वच झाले हैराण..
सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे. ज्यावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे नवनवे फोटोज् व्हायरल होत असतात. तर सध्या बिग बॉस मराठीमध्ये आपली छाप सोडलेल्या एका अभिनेत्याचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेला हा अभिनेता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक गाजलेल्या मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फोटोमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राजेश शृंगारपुरे आहे. बिग बॉस मराठीमध्ये राजेश त्याच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीसह वादग्रस्त गोष्टींमुळेही चर्चेत राहिला होता. सध्या तो सोनी टिव्ही वरील पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेत मल्हारराव होळकर यांची दमदार भूमिका साकारत आहे.
मल्हाररावांचं काही महत्त्वाच्या वाक्यांपैकी माझ्या तोंडून उद्गारलेलं हे वाक्य प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची शिकवण देतं. “जो सही है, वो लाखों लोगों के गलत ठहराने के बाद भी, सही रेहता है”, असं कॅप्शन देत राजेशने हा फोटो शेअर केला आहे. जो चाहत्यांना खूपच आवडतो आहे. या फोटो आणि कॅप्शनवरुन राजेशचा हा लूक त्याच्या चित्रपटातील असल्याचं स्पष्ट होतं.बिग बॉस मराठीनंतर राजेश मराठीमध्ये फारसा कुठे दिसला नाही. मल्हारराव होळकर भूमिकेसाठीच त्याने हा गेटअप केला आहे.मात्र, या लूकमध्ये त्याला कोणीही पटकन ओळखत नसल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
लोकप्रिय टीव्ही अभिनेता राजेश शृंगारपुरे याचे लाखो चाहते आहेत. मराठी असो वा हिंदी सिनेमा, राजेश शृंगारपुरे प्रत्येक पात्र उत्तम प्रकारे जगतो. त्याची हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं करते.त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात “परम वीर चक्र” या चित्रपटाद्वारे केली, ज्यामध्ये त्याने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका केली होती.
अभिनय क्षेत्रात पदार्पणानंतर, त्याने सारथी या मालिकेत काम केले, ज्यामध्ये त्याने भगवान कृष्णाची भूमिका केली आणि खूप प्रसिद्ध झाले. आणि मराठी सिनेसृष्टीत गाजलेल्या झेंडा चित्रपटातील त्याच्या अभूतपूर्व अभिनयाने त्याने लोकप्रियता संपादित केली. ज्यामध्ये त्याने राजकारण्याची उत्तमरित्या भूमिका साकारली होती.
त्याचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व चाहत्यांसाठी मोठे आकर्षण आहे, कारण तो अभिनयाव्यतिरिक्त क्रीडा, नाटक आणि इतर साहसी क्रियाकलापांमध्येही तितकेच सक्रिय आहेत.साल २००६ मध्ये, शंभू माझा नवसाचा या चित्रपटात १३ वेगवेगळ्या भूमिका केल्याबद्दल त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आहे.