अरूंधतीच्या मुलीच्या नावामागची ही खास कहाणी माहिती आहे का? लेकीचं नाव इतकं गोंडस..
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते? या मालिकेतील आई म्हणजे मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. आई कुठे काय करते या मालिकेतील लोकप्रिय आणि प्रमुख पात्र आई म्हणजे अरूंधती साकारत आहे. तिने साकारलेली आई आई घराघरात पोहोचली आहे आणि अतिशय लोकप्रिय ठरली आहे. मधुराणी आज महाराष्ट्राची लोकप्रिय आई आहे पण अरूंधतीला मालिकेत तीन मुलं आहेत. तर मधुराणीला खऱ्या आयुष्यात एक गोंडस मुलगी आहे.
मधुराणीच्या मुलीचं नाव आहे अतिशय वेगळं. या नावामागची गोष्ट जाणून घ्या.मधुराणी आणि तिच्या मुलीचं एक वेगळं भावविश्व आहे. यामध्ये दोघी अतिशय रममाण असतात.अरूंधतीला मालिकेत तीन मुलं आहेत. तर खऱ्या आयुष्यात एक. या मुलीचं नाव अतिशय वेगळं आहे. या नावाची एक वेगळी गोष्ट देखील आहे. जी अतिशय रोमांचक आहे. मधुराणीने आपल्या मुलीचं नाव काय ठेवलंय?
मधुराणी आणि प्रमोद प्रभुलकर यांच्या मुलीचं नाव ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ठेवलं आहे. या नावामागची गोष्ट अतिशय रंजक आहे. मधुराणी ‘सुंदर माझं घर’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत होती. या सिनेमाचं संगीत दिग्दर्शनही मधुराणीने केलं आहे. या सिनेमाची गाणी दिलीप प्रभावळकरांना खूप आवडली ते मधुराणीला सेटवर ‘स्वराली’ अशी हाक मारायचे. तुम्हाला मुलगी झाल्यावर तिचं देखील नाव स्वराली असं ठेवा असं म्हणायचे.
View this post on Instagram
अभिनेत्री मधुराणी यांनी झी मराठी वाहिनीवरील इंद्रधनुष्य या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर पुन्हा एकदा असंभव या मालिकेच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सुंदर माझं घर, गोड गुपित, समांतर, नवरा माझा नवसाचा, मणी मंगळसूत्र यांसारख्या मराठी चित्रपटात देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.फक्त १६ वर्षांच्या असतानाच त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पुरुषोत्तम करंडक साठी त्यांनी स्वतः बसवलेल्या नाटकाला पारितोषिक देखील मिळालं होतं. त्यांनी पुणे विद्यापीठातून मास क्युनिकेशनचा कोर्स देखील पूर्ण केला आहे.
मधुराणी यांचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ रोजी झालं. त्यांना एक लहान मुलगी देखील आहे. मधुराणी ह्या अभिनेत्री, कवयित्री, गायिका आणि संगीतकार देखील आहेत मधुराणी आणि प्रमोद प्रभुलकर यांनी फिल्म मेकिंग शिकवण्यासाठी एक कोर्से देखील सुरु केला आहे. प्रमोद प्रभुलकर यांनी युथट्यूब या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.