त्या डायरी मुळे खावा लागला बेदम मार..प्राजक्ता माळीच्या आयुष्यातला किस्सा माहितीये का?
मराठी मनोरंजन सृष्टीत सौंदर्य आणि अभिनय यांच्या जोरावर तरूणांची क्रश बनलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. गेल्या काही काळात ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. प्राजक्ताच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा खच पडलेला पहायला मिळतो. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती व्हायरल झालीच म्हणून समजा. प्राजक्ता सोशल मीडियावर तिचे रोज नवीन आणि युनिक लूक चे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ता माळीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे जी तुफान व्हायरल होते आहे.
तस तर डायरी ही लिहिणाऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. पण ही डायरी कोणाला मार करण्यात आपली भूमिका बजावेल अशी कल्पना देखील कोणी करू शकत नाही. दरम्यान, एका मुलाखतीत प्राजूने तिच्या डायरीचा किस्सा ऐकवला होता. हा किस्सा सध्या व्हायरल होतोय. हा किस्सा चांगलाच मजेशीर आहे. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा किस्सा चांगलाच मजेशीर आहे.प्राजक्ताला सुरूवातीपासूनच डायरी लिहायची सवय होती. दिवसभर जे काही घडलं ती ते या डायरीत लिहायची. पण याच डायरीमुळे तिला एकदा बेदम मार खावा लागला होता.कॉलेजमध्ये शिकत असताना प्राजक्ताची डायरी तिच्या आईला सापडली. याचाच किस्सा प्राजक्ताने सांगितला होता.
ती म्हणाली, ‘मनाला जे वाटतं ते मी माझ्या डायरीत लिहायचे. आजही माझ्याकडे अनेक वर्षापूर्वीच्या डायरी आहेत. एके दिवशी माझ्या आईला माझी डायरी सापडली. तेव्हा मी अकरावीत शिकत होते.’पुढे ती म्हणाली होती,‘मी कॉलेजमधून घरी आले, आई वाटच बघत होती. घरी आल्यानंतर मला आईने झाडूने बेदम मार दिला. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता मी त्या डायरीत काय काय लिहिलं असेल…’
मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन पुढे आलेली प्राजक्ता माळी हायजत्राचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसली. तिचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती तरुणांची क्रश बनली आहे. शिवाय ती एक उत्कृष्ट डान्सर आहे. प्राजक्तानं साल २०११ मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं. आणि त्यानंतर आता चंद्रमुखी, लक डाऊन या चित्रपटात ती झळकली आहे.