मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे आयुष्य नेहमीच सामान्य लोकांच्या आयुष्यात महत्वाचा रोल प्ले करत असतात. त्यांच्या आयुष्यात घडत असलेले बरेच चांगले वाईट प्रसंग चाहत्यांच्या मनावर असर करत असतात. सध्या अनेक कलाकारांचे लग्न होत आहे ज्यामध्ये चाहते खुश आहेत. पण मनोरंजन सृष्टी ही कलाकारांच्या होणाऱ्या ब्रेकअप आणि घटस्फोटामुळे चर्चेत असते. तुम्हाला माहित आहे का एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले कलाकार काही काळातच वेगळे होतात. काही परस्पर संमतीने वेगळे होतात तर काहींचे वाद आणि मनभेद चर्चेत येत असतात. आज आपण अशाच काही मराठी कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या आयुष्यातील ब्रेकअप्स आणि घटस्फोट हे धक्कादायक होते.
स्टार प्रवाह वाहिनीवर आई कुठे काय करते या मालिकेत खलनायिका संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसलेने तिचा मित्र आणि इव्हेंट मॅनेजर अंकित मगरे यांच्या मैत्रीचे रूपांतर साल २०२० मध्ये प्रेमात झाले. मात्र आता ३ वर्षांतच या दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रेमकहाणी नेट कऱ्यांच्या चर्चेचा मोठा मुद्दा बनली होती. पण काही वैयक्तीक कारणामुळे त्यांचे नाते संपुष्टात आले. आता सुयशने आयुषी भावेसोबत लग्न केलय तर अक्षयाने हार्दिक सोबत लग्नगाठ बांधली आहे.
मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत अभिनेत्री रेशम टिपणीस २० वर्षांची असताना संजीव सेठशी लग्न केले होते. ११ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर साल २००४ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रेशम सध्या तिचा बॉयफ्रेंड संदेश कीर्तिकरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वात बोल्ड आणि लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने २०१३ मध्ये अमेय गोसावी सोबत लग्नगाठ बांधली होती. पण काही वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सई ताम्हणकर ने केलेल्या सोशल मीडिया पोस्ट मुळे तिचे आणि तिचे आणि अनिश जोडचे नाव जोडण्यात आले होते. आणि ते आता रिलेशशिपमध्ये आहेत.
झी मराठी वाहिनीवर अस्मिता मालिकेतून एकत्र आलेले अभिनेता पियुष रानडे आणि मयुरी वाघ हे लग्नापूर्वी चांगले मित्र होते. अखेर दोघांनी त्यांचे नाते पुढच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला. पीयूष आणि मयुरी २०१७ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले मात्र त्यांनी काही वेळातच त्यांनी घटस्फोट घेतला.
लोकप्रिय मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा २०१८ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते.या दोघांचा घटस्फोट अलीकडेच सर्वाधिक चर्चेचा विषय होता. अनिकेतने शारीरिक छळ केल्याचा आरोप करत त्याची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने पुणे पोलिस ठाण्यात केला होता.
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे श्री आणि जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर हे ‘ होणार सून मी या घरची’ मालिकेतून एकत्र आले. या दोघांनी साल २०१४ मध्ये लग्नगाठ देखील बांधली पण हे लग्न वर्षभरही टिकू शकले नाही. साल २०१५ मध्ये हे जोडपे वेगळे झाले.
सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांचा घटस्फोट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मानसीने घटस्फोट घेत असल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले आहे.