“तारक मेहता का उल्टा चष्मा” मधील दयाबेनचे पात्र साकारणार ही अभिनेत्री…दिशा वकानीच्या जागी येणार दुसरी अभिनेत्री….

मित्रहो गेली बरेच वर्षे रंगमंचावर प्रत्येक वेळी खास अंदाजात खास नजराणा पेश करत असलेली मालिका “तारक मेहता…” आज देखील तितकीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. हा शो अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत आवडता आहे. शोमध्ये कार्यरत असलेली सगळीच पात्रे मनाला भावतात. त्यांच्या अप्रतिम अभिनयातून हा शो प्रत्येक वेळी खुलतो त्यामुळे गेली १२-१३ वर्षे मालिकेतीची लोकप्रियता वाढतच राहिली आहे. यातील सर्व भूमिका हास्य कल्लोळ उठवतात.

अनेक कारणांसाठी ही मालिका नेहमीच खास ठरली आहे, यातील उत्तम कथानक, तसेच कलाकारांचा अतुलनीय अभिनय व योग्य पध्दतीने केलेल्या मांडणीने या मालिकेला फार कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. मालिकेतील सर्व पात्र अतरंगी आहेत, यातील जेठालाल, दयाबेन, बाघा, भिडे मास्तर, अय्यर, सोढी, डॉ. हाती, पोपटलाल यांसारखी सर्वच पात्र मन प्रसन्न करतात. प्रत्येक भूमिकेत एक निराळाच खास अंदाज आहे त्यामुळे प्रत्येक भूमिका खास बनते.

मालिकेतील दयाबेन आपल्या बोलण्याच्या निराळ्या पद्धती मुळे तसेच अतरंगी देहबोली मुळे नेहमीच रसिकांची आवडती राहिली आहे, या पात्राची लोकप्रियता इतक्या दिवसात किंचितही कमी झालेली नाही. गेल्या खूप काळापासून हे पात्र मालिकेत न्हवते, मात्र आता हे पात्र मालिकेत परत येत असल्याची माहिती मिळाली आहे. मित्रहो आता पुन्हा एकदा दयाबेन मालिकेत एन्ट्री घेणार आहे, त्यामुळे आता लवकरच चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. यामध्ये आता दिशा नसली तरी “हम पांच” मधील स्वीटी उर्फ अभिनेत्री राखी विजान आपल्या भेटीस येत आहे.

 

राखी आता पडद्यावर या मालिकेत दयाबेंनच्या भूमिकेत दिसणार आहे. राखी बऱ्याच दिवसातून आता पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे, रिपोर्ट्स नुसार दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी राखीला संपर्क करण्यात आला आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे. आजवर तिने “हम पांच” , “देख भाई देख”, “बनेगी अपनी बात” , “नागीन 4” यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.शिवाय तिने “गोलमाल रिटर्न्स” यांसारख्या बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले असून ती “बिग बॉस २” मध्ये सुद्धा झळकली होती.

आता लवकरच राखी आपणाला दयाबेनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, हे पात्र नक्कीच ती सुंदर साकारेल. दयाबेन ही भूमिका प्रेक्षकांना खूप मनोरंजित करते, हे पात्र रसिकांच्या मनात घर करून आहे त्यामुळे याची लोकप्रियता आजही मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही लोकप्रियता इथून पुढे देखील अशीच स्थिर राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप