माझा बॉयफ्रेन्ड आहे हे मी त्याला…सर्वांच्या लाडक्या अनामिकाच्या आयुष्यातील ‘त्याच्या’ बद्दल चर्चा झाली सुरू..

0

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आजही त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यात टॉप ला आहेत. अशीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. सध्या ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

साल २०१८ मध्ये तिने झी मराठीवरीलच आलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत तिने साकारलेली राजनंदिनी सरंजामेची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने झी मराठीवर पुनरागमन केलं आहे.झी मराठीवरच्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी साकारलेल्या सौरभ आणि अनामिका या पात्रांची अनोखी प्रेमकहाणी पहायला मिळते आहे.

पण सध्या शिल्पा चर्चेत आली आहे. आणि तिचे चर्चेत येण्यामागचे कारण आहे तिने दिलेली एक मुलाखत. युट्युबवरील अमृता फिल्म्स या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिने तिच्या बॉयफ्रेन्ड आणि एका आवडलेल्या व्यक्तिबद्दल सांगितलं.या क्षेत्रात काम करताना मी कधीच कोणत्या अ‍ॅक्टरच्या प्रेमात पडले नाही. कारण सतत आरसा बघणारा पुरूष भावला नाही मला. अर्थात हा त्यांच्या कामाचा भाग आहे…,असं ती म्हणाली.ती म्हणाली, ‘फिल्म इन्स्टिट्यूटची एक डिप्लोमा फिल्म मी केली होती. तेव्हा मी कॉलेजात होते.

कॉलेजातला कोणताच मित्र मला आवडला नाही. पण इंडस्ट्रीत खूप कमी लोकांकडे पाहून मला असं वाटलं की यांच्याशी लग्न झालं असतं तर मला आवडलं असतं.’त्याने मला प्रपोज केल्यावर, माझा बॉयफ्रेन्ड आहे हे मला त्याला सांगावं लागलं आणि आमची मैत्री तुटली. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही पुन्हा इंडस्ट्रीत काम करताना भेटलो. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा खूप गंमतीने या विषयावर बोललो. पण मी त्याचं मन तेव्हा दुखावलं. आजही मला त्या गोष्टींचं मला दु:ख वाटतं, असंही तिने सांगितलं.

शिल्पाने महाविद्यालात असतानाच नाटकात काम करायला सुरूवात केली. वयाच्या १७व्या वर्षी पहिलं नाटक करणा-या शिल्पाला यानंतर अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. काही जाहिरातींमध्ये ही तिने काम केले.शिल्पाने १९९३ मध्ये ‘ब्योमकेश बक्षी’या हिंदी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. दूरदर्शनवरच्या या गाजलेल्या मालिकेतील एका एपिसोडमध्ये तिने एक पाहुण्या कलाकाराची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आताही ती आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप