अंकुश चौधरी च्या सिनेमातून पदार्पण करत आहे मराठीतील या प्रसिद्ध दिग्दर्शकाची लेक!!

लवकरच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामध्ये शाहीर साबळे यांनी भूमिका कोण साकार करणार या बाबत चाहत्यांना उत्सुकता लागली होती. याच पार्श्वभुमीवर आता या चित्रपटासंदर्भात एक अत्यंत मोठी बातमी पुढे येत असून याची माहिती स्वत: दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिली आहे.

या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यापासून हा चित्रपट बराच चर्चेत आला आहे! मराठीतील दिग्गज अभिनेता अंकुश चौधरी यात शाहीर साबळे यांची भूमिका करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, यासाठी अंकुश आहे खास लूक देखील रीव्हील करण्यात आला आहे, तर
शाहिर साबळे यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी भानुमती कृष्णकांत साबळे यांची भूमिका आता केदार शिंदे यांची मुलगी शाहीर साबळे यांची पणती सना शिंदे साकारणार आहे.
मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आपले पदार्पण करत आहे.

महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेबद्दल केदार शिंदे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. केदार शिंदेंच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पसरलेली बघायला मिळत आहे. केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“आज 3 सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं…. सौ. भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’. पणजीच्या भूमिकेत पणती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!’ पुढच्या वर्षी 28 एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!!”

चित्रपटाचे पोस्टर पाहून केदार शिंदे यांच्या मुलीला पहिल्यांदा अंकुश चौधरी सोबत स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी सर्व चाहत्यांमध्ये उत्सुकता पसरेलेली आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप