सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये अनेक कलाकारांची सरप्राइज लग्न पहायला मिळत आहेत. आणि या यादीत आता टीव्हीवरील लाडकी बहु असणारी गोपी अर्थात देवोलीना भट्टाचार्जी हीचे नाव घेतले जात आहे. देवोलीना भट्टाचार्जी हिने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. १४ डिसेंबर रोजी तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. देवोलीनाच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर तिचा पती नेमका आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली. मात्र काही जणांनी तिला आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलर्सना आता देवोलीनाने उत्तर दिलं आहे.
देवोलीनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये चाहत्यांना आश्चर्यचकित करणारे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये देवोलिना नववधूच्या वेशात अगदी सुंदर दिसत आहे. बांगड्या, हातात कलिरे, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिका अतिशय सुंदर दिसत आहे. इतकंच नाही तर पुढच्या स्टोरीमध्ये देवोलिना एका व्यक्तीचा हात धरताना दिसत आहे. ज्यामध्ये दोन्ही हातात अंगठी घातली आहे. . पण अचानक तिचे हळद आणि आता ब्रायडल लूकमधील फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
View this post on Instagram
तर हा व्यक्ती आहे देवोलीनाचा जिम ट्रेनर शाहनवाज.. हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दरम्यान, शाहनवाज मुस्लीम असल्याने देवोलीनाला ट्रोल केलं जातंय. एका युजरने देवोलीनाची खिल्ली उडवल तिला विचारलं की तिची मुलं हिंदू असतील की मुस्लीम? काही वेळानंतर संबंधित युजरने त्याचं ट्विट डिलिट केलं, मात्र त्यावर देवोलीनाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.
‘माझी मुलं हिंदी असो किंवा मुस्लीम, तुम्ही विचारणारे कोण? तुम्हाला जर मुलांची इतकी काळजी असेल तर बरीच अनाथाश्रमं आहेत, तिथून एखाद्याला मुलाला दत्तक घ्या. तुमच्या हिशोबाने त्याचा धर्म आणि नाव निवडा. माझी पती, माझी मुलं, माझा धर्म, माझे नियम.. तुम्ही विचारणारे कोण’, असा सवाल देवोलीनाने केला.
यापुढे आणखी एक ट्विट करत तिने लिहिलं, ‘मला आणि माझ्या पतीला सोडा, आम्ही आमचं बघून घेऊ. दुसऱ्यांच्या धर्माविषयी गुगल सर्च करण्याआधी तुम्ही तुमच्या धर्मावर लक्ष केंद्रीत करा आणि चांगली व्यक्ती बना. एवढं तर मला नक्कीच माहीत आहे की तुमच्यासारख्या लोकांकडून ज्ञान घेण्याची मला अजिबात गरज नाही.’
देवोलीनाच्या या लग्नामुळे तिचा सख्खा भाऊ अंदीप भट्टाचार्जीदेखील खूश नसल्याचं ऐकण्यात येत आहे. देवोलीनाच्या लग्नानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत त्याची नाराजी व्यक्त केली आहे.