देवमाणूस २ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्या जागी येणार हि नवीन मालिका…
छोट्या पडद्यावरील देवमाणूस या मालिकेची क्रेझ भरपूर प्रमाणात दिसून येते. या मालिकेच्या पहिल्या सिझनने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. आणि या मालिकेच्या दुसऱ्या सिझननेही तितक्याच प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. सध्या मालिकेत झालेल्या इन्स्पेक्टर जामकरच्या एंट्रीने मालिकेत नवे वळण आले आहे. त्यामुळे येणारे ट्विस्ट अँड टर्न पाहण्यात आणखी मजा येते. पण मालिकेशी निगडित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकावरून मालिका संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसचं मालिकेचा हा शेवट नसून तिसरा भाग येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मालिकेच्या पहिल्या सिझनपासूनच डॉक्टर अजित साठी त्याचा चाहता वर्ग वेडा आहे. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात नटवर सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला.
डॉक्टर अजितचा डाव संपवण्यासाठी त्याच्यापेक्षाही तरबेज आणि हुशार असणारा व्यक्ती हवा, त्याच्या पेक्षाही वजनदार व्यक्तीमत्व हवं, यासाठी त्याच्या तोडीस तोड देणारा व्हीलन म्हणून मालिकेत मार्तड जामकर या अधिकाऱ्याची एन्ट्री करण्यात आली. अभिनेते मिलिंद शिंदे ही भूमिका साकारत आहे.
मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेते मिलिंद शिंदे यांनी एन्ट्री केल्यानंतर मालिकेनं पुन्हा एकदा जोर पडकला आहे. मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कथानकानं वेग पकडला आहे. त्यांच्या येण्यानं मालिकेला वेगळंच वळण आलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोंवरून ही मालिका आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. डॉक्टर जामकरच्या जाळ्यात अडकणार का? की यावेळीही तो यातून बाहेर पडणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं पहायला मिळते आहे.
मालिका संपणार असल्याचं आणखी एक कारण म्हणजे, देवमाणूसच्या निर्मात्यांची आणखी एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आप्पी आमची कलेक्टर’ असं या मालिकेचं नाव असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला होता. याचे फोटोही अनेक कलाकरांनी शेअर केले आहेत. पण देवमाणूस या मालिकेची लोकप्रियता पाहता ही मालिका बंद होत असल्याने साहजिकच त्यांचे चाहते नाराज होताना दिसून येत आहेत. याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.