‘देवमाणूस’ किरण गायकवाड पडला या अभिनेत्रींच्या प्रेमात… व्हिडिओ झाला व्हायरल..
झी मराठी वाहिनीवरील सर्वात थरारक अशी छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेच्या पहिल्या पर्वाने यशस्वी सपांदित केल्यानंतर लगेचच दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आले आहे.
मालिकेच्या दुसऱ्या पर्वावर चाहते बरेच नाराज झालेले आढळले तरीही प्रेक्षकही भावुक झाले होते. मालिकेचा मुख्य चेहरा असलेला अभिनेता किरण गायकवाड सध्या काय करतोय हा प्रश्न प्रेक्षक तसंच त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
दरम्यान, किरण गायकवाडने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडियो शेयर केला आहे. जो पाहून तो प्रेमात पडला की काय असा प्रश्न नेटकऱ्याना पडला आहे. दरम्यान, किरण गायकवाड ने हा व्हिडीओ अभिनेत्री पूर्वा शिंदे सोबत शेयर केला आहे.
ही काही पहिली वेळ नाही , की किरण आणि पूर्वाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.किरण आणि पूर्वाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. छान जोडी आहे, वगैरे अशा कमेंट्स या व्हिडिओखाली पाहायला मिळत आहेत.
लागीरं झालं जी’ या मालिकेत किरणनं भय्यासाहेब ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. या मालिकेतील किरणची सहकलाकार पूर्वा शिंदे हिच्यासोबत त्यानं हा रिल्स व्हिडिओ शेअर केलाय. ‘लागीरं…’मध्ये दोघंही नवरा-बायकोच्या भूमिकेत होते. पण सध्या त्यांच्या या रोमॅन्टिक व्हिडिओची जोरात चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
किरण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे रिल्स व्हायरल होताना दिसतात. पण नुकताच त्यानं शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. चर्चेचं कारण म्हणजे, एका रोमॅन्टिक गाण्यावर त्यानं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हा रिल व्हिडिओ बनवलं आहे. त्यामुळं या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान मध्यंतरी किरण गायकवाडची एक पोस्ट व्हायरल झाली होती.
“काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद, #भेटू लवकरच”, असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. परंतु, या पोस्टमध्येही एक ट्विस्ट आहे. भेटू लवकरच हा हॅशटॅग त्याने वापरल्यामुळे तो त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशन करत असल्याची शक्यताही नेटकऱ्यांनी वर्तवली आहे. तसंच काही वैयक्तिक कारणदेखील असल्यामुळे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकणं बंद केल्याचं म्हटलं जात होत.
तो सोशल मीडियावरून काही काळासाठी गायब झाल्यावर चाहते नाराज झाले होते. कारण किरण गायकवाड नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट्स शेयर करत असतो. पण त्याने अचानक सोशल मीडियावरून एक्झिट घेतल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता पुन्हा नव्याने तो जोमात सोशल मीडियावर हटके पोस्ट ने साऱ्यांचे लक्ष वेधण्याचे काम करतो आहे. जे तुफान व्हायरल होतो आहे.