अखेर, देवमाणूस २ मालिका ठोकणार प्रेक्षकांना रामराम.. अशा प्रकारे होणार मालिकेचा शेवट
झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका देवमाणूस २ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. पण अखेर आता ही मालिका खरच चाहत्यांना निरोप देणार आहे. तस पाहता, मालिकेच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर मालितेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचंही दिसून आलंय. सोशल मीडियावर प्रेक्षक , नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसतात. मालिकेचं कथानक भरकटत आहे, असं प्रेक्षकांनी म्हटलं होतं. पण असं असलं तरी मालिकेत एकामागोमाग एक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. यामुळेच मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ही मालिका संपणार असून त्या जागी नवीन मालिका सुरू होणार आहे. तरी अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही प्रेक्षकांना मिळाली नाहीत. त्यामुळं प्रेक्षक मालिकेच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. डॉक्टर अजय कुमार देव हाच देवीसिंग आहे आणि हाच नटवरसिंग आहे, हे कातळवाडीतील लोकांसमोर येण्याची प्रेक्षक वाट पाहत आहे. खरं तर मालिकेत बज्याचा मृत्यू दाखवल्यानं मालिकेला वेगळं वळण आलंय. देवीसिंगचा खरा चेहरा समोर आल्यानंतर बज्या एका बुक्कीतच डॉक्टरला कायमचा आराम देणार असं वाटत असतानाच, त्याचाच खून झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे मालिकेचं कथानक नक्की कोणत्या वळणावर जात आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिका अचानकपणे एक्झिट घेत आहे.
दरम्यान, मालिकेत दाखवल्याप्रमाणे मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याकडून पुराव्यांची फाईल चोरी करण्यात देवीसिंगला यश आलं. आणि हे दृश्य अगदीच न पटण्यासारखे असल्याने प्रेक्षक नाराज झाले. पोलिस अधिकाऱ्याची भूमिका इतकी बेजबाबदार कशी दाखवली जाऊ शकते, असा प्रश्नही प्रेक्षक उपस्थित करत आहेत. नाम्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असतानाच इन्स्पेक्टर जामकर देवीसिंगला अटक करतो. त्यानंतर तो सध्या तुरुंगात असल्याचे दाखवले जात आहे. आता डिंपल त्यांच्यासोबत केलेल्या गुन्हांची कबुली देऊन माफीची साक्षीदार होणार का? डॉक्टरला पुन्हा वाचवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मध्यंतरी मालिकेत दाखवण्यात आलेल्या छोट्या मुलीच्या खूनाच्या ट्विस्ट मुळे प्रेक्षक आधीच खवळले होते. सोशल मीडियावर याबाबत नेटकऱ्यानी आपला राग व्यक्त केला होता. मालिकेच्या पहिल्या सिझननंतर दुसऱ्या सिझन साठी प्रेक्षक उत्सुक होते पण त्यांच्या हाती निराशाच पडली. पण आता मालिकेचा शेवट कशाप्रकारे होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.