झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेने प्रेक्षकांवर जणू काही मोहिनी घातली होती. आणि ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस… या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलेसे केले. मालिकेत सिरीयल किलर डॉक्टर डॉक्टर अजित कुमार देव अनेकांना फसवताना दाखवण्यात आले आहे. अभिनेता किरण गायकवाड ने डॉक्टरची जिवंत भूमिका साकारून सर्वानाच चाट पाडले. या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्प्रतिसादामुळे अगदी काही अवधीत मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. पण मालिकेत येणाऱ्या वळणांमुळे चाहते काहीसे नाराज झाले. नाही होय करत आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
पण देवमाणूस मालिकेच्या चाहत्यांना तेवढेच दुःखही झाले होते. म्हणून देवमाणूस मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची माहिती समोर आली आहे.
आता ही बातमी ऐकून तुम्हाला साहजिक वाटेल की देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग येईल. पण तसे नाही तूर्तास ही मालिका आता हिंदी मध्ये प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचा हिंदीमधील प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हिंदी मालिकेत अभिनेता किरण गायकवाडच हिंदी मालिकेमध्येही काम करताना दिसेल. अँड टीव्ही वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
View this post on Instagram
येत्या २४ सप्टेंबरपासून रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित होईल. मराठीमध्ये या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता हिंदीमध्ये या मालिकेला कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल.मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच यूजर्सनी खुश होत कमेंट केल्या आहेत.
डिंपल, बाबू काका, मंगलताई, सरू आजी, टोन्या, रूपा, बज्या, नाम्या, मंजू, विजयभाऊ, रेश्मा, अपर्णा, इन्स्पेक्टर दिव्या सिंग, वकील आर्या ही पात्रं तुफान लोकप्रिय झाली. डॉ. अजितकुमार देव याच्या भूमिकेत किरण गायकवाड याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. प्रमुख भूमिकेतील किरणचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. या मालिकेतील सरूआजीच्या शिव्यांनी तर खूपच प्रसिध्दी मिळवली. आता हा सगळा खेळ हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही पहायला मिळणार आहे.
अँड टीव्हीवाहिनीवर या मालिकेचा हिंदीमध्ये डब केलेला प्रवास उलगडणार आहे. सोशल मीडियावर प्रोमो झळकत असून देवमाणूस या मालिकेचे वेध आता हिंदी प्रेक्षकांनाही लागले आहेत. सोशल मीडियावर हा हिंदी प्रोमो व्हायरल होत आहे, अनेक मराठी प्रेक्षकांनी या व्हिडिओवर कमेंट करत ‘देवमाणूस’टीमचे कौतुक केले आहे.
दरम्यान झी मराठी वाहिनीवर देवमाणूस मालिकेच्या जागी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.