छोटया पडद्यावर काही वर्षांपुर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयानी या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावले होते. संग्राम आणि देवयानी यांची प्रेमकहाणी चाहत्यांना खूपच भावली होती. या मालिकेतून संग्राम घरोघरी पोहोचला. या मालिकेतील संग्रामचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता. या मालिकेतील संग्राम देवयानीची जोडी सर्वांना लक्षात आहेच पण तुम्हाला मालिकेतील आणखी एक जोडी लक्षात आहे का? या मालिकेतील ती जोडी म्हणजे संग्राम आणि खुशबू यांची.
दोघांची प्रेमकहाणीही तितकीच वेगळी आहे. गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रेमाचे बंध अधिक घट्ट झालेत. पहिल्यांदाच संग्रामने आपल्या लेडी लव्ह खूशबु सह लग्न करण्याचे कारण सांगितले आहे.संग्राम आणि खुशबू यांच्या मालिकांचे सेट आसपासच होता. त्यामुळे त्या दोघांची तोंडओळख होती पण खुशबूच्या मनात संग्रामबद्दची इमेज काही खास नव्हती. त्याला खूप ऍटिट्यूड आहे असं खुशबूला वाटायचं. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र एका मालिकेत काम केलं. तेव्हा संग्रामबद्दल खुशबूचं मत बदललं आणि त्यांच्यात मैत्री झाली.
View this post on Instagram
जर खुशबूचं लग्न मालिकेत संग्रामसोबत झालं नाही तर ती मालिका सोडेल अशी ताकीद खुशबूने मालिकेच्या निर्मात्यांना दिली होती आणि कथानकामधील काही बदलामुळे खरंच खुशबूचं लग्न संग्रामशी झालं नाही आणि खुशबूने ती मालिका सोडली. त्याक्षणी संग्रामने ठरवलं की मालिकेत नाही पण खऱ्या आयुष्यात तो खुशबूशीच लग्न करणार आणि त्याने खुशबूला लग्नाची मागणी घातली. आणि मार्च २०१८ मध्ये त्यांचं थाटामाटात लग्न पार पडलं.
संग्राम आणि खुशबूची लव्हस्टोरी देखील त्यांच्यासारखीच अनोखी आणि सुंदर आहे. सध्या ‘सूर राहू दे’ मालिकेत संग्राम साळवी भूमिका साकारत आहे तर ‘आम्ही दोघी’ मालिकेत खुशबू तावडे झळकत आहे. चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या ‘सांजबहर’मध्ये संग्राम आणि खुशबूने एकत्र काम केले होते.
View this post on Instagram
खुशबूनेदेखील मराठी बरोबरच अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘प्यार की एक कहानी’, ‘तेरे लिये’, ‘मेरे साई’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी तर ‘आम्ही दोघी’, ‘भेटशील तू नव्याने’, ‘पारिजात’, ‘देवयानी’ यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच संग्राम साळवीचा स्वतःचा ‘साई वॉक कॅफे’ आहे.
खुशबू तावडेने २ नोव्हेंबर २०२१ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. पण ही गोड बातमी तिने बालदिनाचे औचित्य साधत चाहत्यांसोबत शेअर केली. खुशबूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने बाळाचे नावही चाहत्यांसोबत शेअर केले आहे.