बॉलिवूड एक अशी दुनिया आहे जिथे नाव कमवायला जितकी मेहनत घ्यावी तितकीच मेहनत ते नाव टीकवण्याठी ही घ्यावी लागते. ग्लॅमरसच्या या दुनियेत केव्हा कोणाची स्टार म्हणून एंट्री होईल आणि कधी कोणता स्टार गुमनाम होईल हे सांगणे तसे कठीणच आहे. बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी मोठा पडदा गाजवला होता पण आज ते बेरोजगार आहेत. असंच काहीसं घडलंय शाहरुख खानसोबत चित्रपटात झळकलेल्या एका अभिनेत्रीसोबत. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सिनेसृष्टीतील अनुभवाविषयी सांगतिलं.
शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री डेलनाज इराणी बऱ्याच काळापासून कलाविश्र्वा पासून दूर आहे. नुकतीच तिने सिद्धार्थ कन्ननच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. सिद्धार्थसोबतच्या या मुलाखतीत डेलनाजने खुलासा केला की, गेल्या काही वर्षांपासून तिच्याकडे काम नाही. साल २०११नंतर ती कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसली नाही. ती अखेरची शाहरुख खानच्या रा.वनमध्ये दिसली होती.
डेलनाज पुढे म्हणाली, सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. तीने नीना गुप्ता यांचे नावही घेतले आणि म्हणाली, ‘मी नीना गुप्ता देखील नाही, परंतु कदाचित कोणीतरी हे पाहील आणि माझ्यासाठी काही योग्य काम बाहेर येईल. मी कोणतीही एजन्सी किंवा व्यवस्थापक नियुक्त केलेला नाही. कल हो ना हो नंतर मला थोडी ओळख मिळाली, तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी माझा थेट संबंध होता पण आजकाल तो दुवा तुटला आहे. आता तुम्हाला त्यांच्या कार्यालयात जावे लागेल, तिथे गटबाजी असते. डेलनाज इराणीने म्हटले आहे की, जर तुम्ही दीर्घकाळ चित्रपट दिसला नाही तर आपोआप यातून बाहेर पडत जाता.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिने या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, ज्यात ती बोललीही नाही, पण त्यांचे म्हणणे पूर्णपणे वेगळे मांडण्यात आले. यावर तीव्र आक्षेप घेत तिने ही पोस्ट शेयर केली आहे. अगदी ती म्हणाला- ‘शरम वाटली पाहिजे! याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि लोकांना किमान संपूर्ण मुलाखत काळजीपूर्वक ऐकण्याची आणि मगच मत बनवण्याची सूचना केली आहे.
‘एक महल हो सपना का’ पासून आतापर्यंत डेलनाझ सतत काम करत आहे. ती बेरोजगार नाही किंवा तिला काम मागण्याची गरज नाही, मोठ्या पडद्याबद्दल सांगायचे तर, कल हो हो या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी डेलनाझ शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर खूप प्रसिद्ध झाली. यानंतर ती प्यार में ट्विस्ट, दिल ने जिस अपना कहा, भूतनाथ, रा वन यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
दरम्यान, टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री डेलनाज इराणीने तिच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भरपूर पैसा आणि प्रसिद्धीही मिळवली. पण अचानकपणे डेलनाज कुठे आहे आणि ती गेली अनेक वर्षे काय करत आहे हे कोणालाच माहीत नव्हते.