छोटया पडद्यावर असे काही निवडक शो आहेत जे दीर्घकाळापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशाच लोकप्रिय शोज पैकी एक शो म्हणजे म्हणजे CID. गेली २१ वर्षापासून टेलिव्हिजन वर आपले अधिराज्य गाजवणारा हा शो साल २०१८ मध्ये कोणत्याही पूर्व सूचनेविना हा शो अचानक बंद झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात इतके वर्ष सुरू असलेला हा पहिलाच शो आहे. प्रेक्षकांनीही या शोला इतकी वर्षे आवडीने पाहिले. सोनी टिव्ही वरील सीआयडी या मालिकेने चाहत्यांच्या मनात आपले असे वेगळे स्थान मिळवले आहे.
या शो मधील विशेष प्रसिद्धी मिळाली ती दया या पात्राला. दया दरवाजा तोड दो.. हा डायलॉग आजही चाहत्यांचा आवडता डायलॉग आहे आणि त्यावर त्याने मारलेली कानफट भल्याभल्यांना आठवते. दया अर्थात अभिनेता दयानंद शेट्टी त्याच्या फिटनेसमुळे खूपच लोकप्रिय आहे. एका दणक्यात तो दरवाजा तोडतो. पण नुकतंच दया यांची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीला शारीरिक व्याधी ने ग्रासले आहे.
अभिनेता दयानंद शेट्टीचे काही दिवसांपूर्वी हेअर ट्रान्सप्लांट करण्यात आले. त्याच्या केसांची वाढही सुरू झाली आहे. पण त्यांचा केस प्रत्यारोपणाचा अनुभव भयानक ठरला. दयानंद शेट्टी यांनी नुकतेच त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितले आहे.
दयानंद शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ”सुरुवातीला बरेच लोक तुम्हाला घाबरवतात की खूप त्रास होतो. सूज येते. पण मला आधी सूज आली नाही. केस प्रत्यारोपणानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी माझ्या पापण्यांजवळ थोडी सूज आली. त्याशिवाय चेहऱ्यावर सूज नव्हती. केस प्रत्यारोपणाला २० दिवस झाले आहेत. सुरवातीला होणारा त्रास आता बराच कमी झाला आहे. पण ज्या भागात केसांचे प्रत्यारोपण झाले आहे, तिथे अजूनही थोडा बधीरपणा आहे. दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत म्हणून मी पेन किलर घेणे बंद केले आहे.”दयानंद शेट्टी पुढे म्हणाले, ‘कधीकधी मधेच डोके दुखते कारण सुन्नपणा येतो. चुकून कुठेतरी काहीतरी आदळलं तर कधी कधी खूप त्रास होतो.
दयानंद शेट्टी टीव्ही इंडस्ट्री मधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने सी आय डी सोबत काही कॉमेडी शोमध्येही काम केले आहे, पण त्याला ओळख ‘सीआयडी’मधील दया या व्यक्तिरेखेने मिळाली. ‘जब दया का हाथ पडा है ना तो मुह के अंदर दांत से पियानो बजने लगता है’ हा त्यांचा सिग्नेचर डायलॉग खूप गाजला. दयानंद शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये ‘दिलजले’, ‘जॉनी गद्दार’, ‘रनवे’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये त्याने उत्कृष्ट भूमिका साकारून चाहत्यांना भुरळ पाडली. आता लवकरच तो ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात विकी कौशल सह कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका आहे.