सर्वांचा लाडका दादुस घेणार छोट्या पडद्यावर भन्नाट एन्ट्री.. या मालिकेत करणार पदार्पण
सध्या जिकडे बघावं तिकडे सोशल मीडियावर युट्यूबर्स आणि इंस्टाग्राम स्टारचा बोलबाला असलेलं पहायला मिळत आहे. या नवख्या सेलिब्रिटीची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पहायला मिळत असते. त्याचाच उपयोग मालिकांना होतो. मराठीत मालिकांमध्ये आतापर्यंत सोशल मीडिया स्टार असलेल्या बालकलाकारांची एंट्री होत होती. पण आता या यादीत अजून एका सोशल मीडिया स्टार चे नाव दाखल होणार आहे. हा प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजेच सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच विनोदी कलाकार, सोशल मीडिया स्टार विनायक माळी आता छोट्या पडद्यावरील मालिकेत एन्ट्री घेणार आहे.
सन मराठी वाहिनीवरील माझी माणसं या मालिकेत हर्षदा आणि विघ्नेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. दरम्यानच्या काळात या दोघांच्या हळदीचा समारंभ पार पडला त्यावेळी बिग बॉस फेम दादूसने त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी दादूसने हळदीचे गाणं म्हटल्याचे पहायला मिळाले.हर्षदाचे लग्न होण्यासाठी गिरीजा अनेक संकटांना तोंड देत आहे. येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर ती यशस्वीपणे मात करत आहे.
दरम्यान,मालिकेत हर्षदाच्या लग्नासाठी तिने पैशांची जुळवाजुळव केली. मात्र आता या लग्नात आणखी एक विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. विघ्नेशने आपल्या मुलीला फसवलं तो हर्षदासोबत लग्न करतोय हे पाहून नेहाचे वडील त्याला भर मंडवात त्याला हर्षदासोबत लग्न करण्यापासून थांबवताना दिसतात.
त्याचवेळी आणि नेहाच्या पोटातील बाळ विघ्नेशचे आहे याचा खुलासा करतात. मात्र तेवढ्यात नेहाच्या पोटात असलेल्या बाळाची जबाबदारी घेणारा व्यक्ती तिथे येतो. या सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तिथे एक खास व्यक्ती येतो आणि हा खास व्यक्ती दुसरा कोणी नसुन सर्वांचा लाडका दादुस म्हणजे विनायक माळी असणार आहे.
View this post on Instagram
विनायक माळीने आतापर्यंत आपल्या व्हिडीओज मधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे.आता हा विनायक माळी कायमचा मालिकेत राहणार कि फक्त एका एपिसोड पुरताच आला होता ते येणाऱ्या काळात समोर येईल.विनायक माळी हा सोशल मीडिया स्टार आहे हे सर्वांना माहीत आहे.त्याच्या आगरी भाषेतील व्हिडीओंनी तरुणांना भुरळ पाडली. त्याच्या भन्नाट व्हिडीओंनी सर्वांना अक्षरशः वेड लावलं. विनायक माळी ते सर्वांचा लाडका दादूस हा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याने आपल्याच भाषेत मजेशीर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली अन् लोकांना ते प्रचंड आवडले. हाच धागा पकडून, त्याने यशाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि विनायक ‘स्टार’ झाला.
आता विनायक पहिल्यांदाच मराठी मालिकेचा भाग बनलेला पाहायला मिळणार आहे. माझी माणसं या मालिकेत तो अशीच एक जबरदस्त एन्ट्री करत धमाल उडवून देणार आहे. त्यामुळे त्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक आहेत.