IPL 2024 मध्ये धोनीच्या जागी CSK चे हे खेळाडू सांभाळणार कर्णधार पद CSK player

CSK player इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होणार आहे आणि IPL च्या 17 व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नईने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

 

पण आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच एमएस धोनीने एक मोठा खुलासा केला असून धोनी आयपीएल 2024 मध्ये नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, आता धोनी नव्या भूमिकेत दिसतो का, हे पाहायचे आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार धोनी आयपीएल 2024 मध्ये कर्णधार बनू शकत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला धोनीनंतर कोणते खेळाडू CSK संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतात हे सांगणार आहोत.

रुतुराज गायकवाड
धोनीनंतर कर्णधार बनण्याच्या यादीत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीचा फलंदाज रुतुराज गायकवाड पहिल्या क्रमांकावर आहे. कारण, असे मानले जात आहे की आता फक्त ऋतुराज गायकवाडच आयपीएल 2024 मध्ये CSK चे नेतृत्व करू शकतात.

ऋतुराजला टीम इंडियाच्या कर्णधारपदाचाही अनुभव आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली तो खूप काही शिकला आहे. त्यामुळे त्याला संघाचा पुढील कर्णधार बनवले जाऊ शकते. ऋतुराज गायकवाड यांनाही ५२ सामन्यांचा अनुभव आहे.

रवींद्र जडेजा
तर संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही या यादीत आहे. कारण, जडेजा बराच काळ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असून त्याला 226 सामने खेळण्याचा अनुभवही आहे. चेन्नईने 2022 मध्ये रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले होते. पण संघाच्या खराब कामगिरीमुळे मधल्या मोसमात धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. पण चेन्नई आता धोनीनंतर पुन्हा रवींद्र जडेजाला आयपीएल 2024 मध्ये कर्णधार बनवू शकते.

मिचेल सँटनर
त्याचबरोबर या यादीत तिसरे नाव आहे संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरचे. मिचेल सँटनरने 2019 मध्ये CSK साठी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघाचा एक भाग आहे. त्यामुळे मिशेल सँटनर आयपीएल 2024 मध्ये कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे.

मिचेल सँटनरने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५ सामने खेळले आहेत. पण त्याला 100 T20I सामने खेळण्याचाही अनुभव आहे. तर मिचेल सँटनर देखील टी-२० फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघाकडून खेळतो. त्यामुळे त्याला कर्णधार बनण्याचाही चांगला अनुभव आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti