छोटया पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असा रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सिझन आता हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. All या सीझनमध्ये स्पर्धक कोण असतील याबाबत सोशल मीडियावर रोज नवनवी चर्चासत्र भरत असतात. दरम्यान गेल्या काही काळात या नव्या पर्वाची जोरदार चर्चा झाली आहे. इतकंच काय तर शो चा होस्ट कोण असेल यावर तर घमासान अशी चर्चा रंगली होती. पण अखेर बाप तो बाप म्हणत महेश मांजरेकर यांनी तेच शो होस्ट करणार असल्याचं घोषित केलं.
दरम्यान, यंदाच्या बिग बॉस सीझन ४ ची कन्सेप्ट All is Well असणार असून याबाबत २ तारखेला गुपित उघड होईल असं या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
या बिग बॉसच्या घरात अनेक लोकप्रिय सेलेब्रिटी स्पर्धक म्हणून पाहायला मिळतात. मागच्या सीझनमध्ये तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या. या घरात एखादा राजकीय नेता असल्यास तुम्हाला कोणत्या नेत्याला पाहायला आवडेल असा प्रश्न पत्रकारांनी महेश मांजरेकर यांना केला. त्यावर मांजरेकर म्हणाले की बिग बॉसच्या घरात संजय राऊतांसह राष्ट्रवादी, भाजपाच्या या नेत्यांना पाहायला आवडेल.
महेश मांजरेकर म्हणाले, “अमोल मिटकरी हेदेखील खूप कडक बोलतात. ते बिग बॉसमध्ये असतील मज्जा येईल. त्याचसोबत भाजपा आमदार नितेश राणे यांनाही मला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल. संजय राऊत असते तर त्यांनाही बिग बॉसच्या घरात असलेले पाहायला आवडेल. ते वेगळा रंग या शोमध्ये भरू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुणकुण मला सहा सात महिन्याआधीच लागली हो कुणाच्या माध्यमातून नव्हे तर कळालं होते.विचारधारा वेगळी असताना सरकार स्थापन झाले. ते कितपत टिकेल असं वाटलं होते. कुठला पक्ष चांगला आणि वाईट हा मुद्द नाही. माझ्या अपेक्षेपेक्षा १ वर्ष जास्तच टिकलं. उद्धव ठाकरेंनी तीन पक्षांना बांधून ठेवले”, असं महेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यामुळे आता शो मध्ये कोणता राजकीय नेता सहभागी होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कलर्स मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर प्रोमो प्रदर्शित होत आहेत. ज्यामध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात येत आहे. हे प्रोमो इतक्या रंजक पद्धतीने शूट करण्यात आले आहेत की नक्की कोण स्पर्धक असेल याची उत्सुकता ताणली जात आहे. त्यामुळे याचा खुलासा आता २ ऑक्टोबरलाच होईल..