कॉमेडियन छोटू दादाची पत्नी आहे इतकी सुंदर की तिच्यासमोर अभिनेत्रीदेखील पडेल फिकी..करते हे काम

0

सोशल मीडियावर सध्या व्हिडिओज आणि शॉर्ट फिल्म्सचा जमाना आला आहे. आताच्या पिढीला यु ट्युबवरती व्हिडिओज अपलोड करून सहज प्रसिद्धी मिळत आहे. यातून कलाकारच नाही तर अनेकांना आपल्या कलागुणांना वाव देण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. असाच एक फेमस यूट्यूबर छोटू दादा जो गेल्या काही काळात खूपच लोकप्रिय ठरला आहे.

मूर्ती लहान पण कीर्ती महान हे समीकरण त्याच्या बाबतीत खरे ठरते. छोटू दादाने अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. छोटू दादाचे खरे नाव शफिक आहे. आणि त्याची उंची ४ फूट आहे पण उंचीने कमी असूनही त्याने खूप नाव कमावले आहे. छोटू दादा सोशल मीडिया आणि यूट्यूबवरून लाखोंची कमाई केली आहे.त्याच्याकडे अनेक वाहनेही आहेत.

पण हे सारे त्याला काही सहज नाही मिळाले. फेमस होण्याआधी छोटू दादाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या शारीरिक अपंगत्वाबद्दल बरंच काही ऐकावं लागलं. कधी कधी लोक त्याची चेष्टा करायचे. पण छोटू दादा नेहमी आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करायचे जेणेकरून त्यांच्या गावातील लोक त्यांना सामान्य वागणूक देतील आणि त्यांचा आदर करतील.

छोटू दादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. छोटू दादाच्या कॉमेडीचे सर्वांनाच वेड लागले आहे. तो मुस्लिम कुटुंबातील आहे आणि त्याने काही काळापूर्वी एका मुलीशी लग्न केले आहे, जी दिसायला त्याच्यासारखीच आहे, त्याच्या बायकोची उंची देखील ४ फूट आहे.

छोटू दादाच्या पत्नीच्या सौंदर्याबद्दल सांगायचे तर ती दिसायला खूपच सुंदर आहे, तिने लग्नापूर्वी हज यात्रा देखील केली आहे. आणि आता ते दोघेही त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहेत. लग्नानंतर दोघांच्‍या लग्‍नाचे फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. ज्यांना त्याच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिले होते. लोक शफीक आणि त्याच्या पत्नीच्या जोडीचे खूप कौतुक करत होते.

छोटू दादा आता ३० वर्षांचा आहे आणि तो मूळचा महाराष्ट्रातील मालेगावचा आहे. छोटू दादाच्या नावाने त्याचे यूट्यूबवरचे व्हिडिओही प्रसिद्ध असून त्यांनी मालेगाव येथून शिक्षण घेतले आहे. छोटू दादा म्हणजेच शफीकने २०१७ पासूनच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर इंटरनेटवर खूप हिट झाला. आता छोटू दादा इंटरनेटवर इतका हिट आहे की खान्देशी मूव्हीजचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. याशिवाय, त्याचे व्हिडिओ इतर चॅनेलवर देखील शेअर केले जातात.

शफीक छोटूने अनेक लोकप्रिय लघुपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या आहेत. त्याचे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात सबस्क्राइबर्स आहेत. यूट्युबवर छोटू दादाचे ३३ दशलक्षाहून अधिक फोलोवर्स आहेत. जर आपण त्यांच्या कमाईबद्दल बोललो, तर ते एका शॉर्ट फिल्मसाठी १ लाख ते १.५० लाख रुपये घेतो आणि त्याची एकूण कमाई २ मिलियनच्या जवळपास आहे.

त्याच्या प्रत्येक व्हिडिओचे व्ह्यूज ३ कोटींच्या वर जातात. छोटू दादा फनी व्हिडिओ आणि त्यातील फनी स्टाइलमुळे प्रसिद्ध झाला आहे. अनेक जण त्यांचे व्हिडिओ शॉर्ट फिल्म्सच्या रूपात बनवतात. इंटरनेटवरील अनेक लेखांमध्ये त्याच्या मालमत्तेबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. या अहवालांनुसार त्याचे उत्पन्नही खूप जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप