बच्चे कंपनीने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव.. या मालिकेतून करतात सर्वांवर जादू..

0

अलीकडे छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत असणाऱ्या मराठी मालिकांमध्ये प्रमुख कलाकारांपेक्षा बालकलाकारांचाच बोलबाला पहायला मिळतो आहे. अनेक चाहते या चिमुकल्यांना पाहण्यासाठी मालिका आवर्जून पाहतात. गोंडस आणि निरागस अशा या चिमुकल्यांचा अभिनय चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. त्यांचा इवल्याशा वयातील ग्रेट अभिनय पाहून भलेभले चाट पडतात तर चाहत्यांचे त्यांच्यावर खुश होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी अशा प्रसिद्ध वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय मलिकांत हे चिमुकले दिसून येतात. चला तर या लाडक्या बच्चे कंपनी विषयी जाणून घ्या या चिमुकल्यांनी चाहत्यांवर कशी जादू केली आहे.

मायरा वायकूळ: झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकूळ ही सध्या प्रचंड गाजली आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने खूपच लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेच्या लोकप्रियतेचे ती एक कारण आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. मालिकेत येण्याआधी ती एक प्रसिध्द युट्यूबर आहे. यूट्यूब वर तिचे ३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आताही ती आपल्या निरागसतेने सर्वांचे मन जिंकते आहे.

अवनी जोशी: स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या टीआरपी चार्टवर आपली जागा कायम केलेल्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील पिहू म्हणजेच अवनी जोशीने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अभिनयासोबतच तिने ‘मी होणार सुपरस्टार’ या शोचं सूत्रसंचालन देखील केलं आहे. ती उत्कृष्ट गाते देखील आणि विशेष म्हणजे तिचे आई वडील देखील लोकप्रिय गायक आहेत.

साईशा भोईर: स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी साईशा भोईर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार आहे.सध्या ती आता ती नवा गडी नवं राज्य मधील चिंगी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिचा गोंडस अभिनय पाहून चाहते आपोआप मालिका बघण्यासाठी आतुर होतात.

अवनी तायडे: तुझेच मी गीत गात आहे मधील दुसरी लोकप्रिय बालकलाकार स्वराज म्हणजेच अवनी तायडे हिने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. तिने दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर तिने मराठी मालिकेत पदार्पण केले.आणि आता ती सर्वांच्या मनाचा ठाव घेते आहे.

अदिरा: कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतील अभ्या आणि लतिकाची मुलगी अदिरा हिचं पात्र साकारणाऱ्या खरं नाव सुद्धा आदिरा असं असून ती सोशल मीडिया स्टार आहे. तिचे अनेक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

साईशा साळवी: स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या लाडक्या लेकीची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका बालकलाकार साईशा साळवी साकारत आहे. साईशाने अनेक जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप