‘चला हवा येवू द्या’ फेम अंकुर वाढवेने मिळवलं मोठं यश, म्हणाला- सांगायला आनंद होत आहे..
झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शो ने सर्वांना हसवून अगदी लोटपोट केलं आहे. या शो मध्ये अनेक विनोदवीर आहेत जे अविरतपणे आपल्याला हस्वण्याचे काम करतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर वाढवेदेखील तितकाच लोकप्रिय विनोदवीर ठरला आहे.
चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अंकुर वाढवे यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शारिरीक मर्यांदांवर मात करत अंकुरनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या याच अभिनयाचे अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही कौतुक केलं आहे. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय. आता पुन्हा एकदा त्यानं असं काही केलं आहे, की त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंकुर वाढवेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. अंकुर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अंकुरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.त्यात त्यानं म्हटलं आहे की, ‘ सांगायला आनंद होत आहे की, अपंग प्रवर्गातून NET (नॅशनल एलिजिबल टेस्ट)२०२२ performing arts विषयामध्ये JRF घेऊन भारतातून एकमेव परीक्षाार्थी म्हणून मी पास झालो.अंकुरनं ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, एकदा अंकुर ने आपल्या आयुष्यातील एक आठवण शेयर करत त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामुळे त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. अंकुर पूर्वी भांड्यांवर नावं लिहायचा, त्यासाठी त्याला प्रत्येक भांड्यामागे दोन रुपये मिळायचे. बेलोऱ्यात लगीन सराईत भांड्यावर नाव टाकायचे दोन रुपये घ्यायचो… अक्षर चांगलं म्हणून लोकं यायचे. दिवसाला १००रुपये कमवायचो… आज बायकोने एक कप चहा दिला…” या पोस्ट वर अनेकांनी कमेंट केल्या होत्या.
दरम्यान, चला हवा येऊ द्या’ या शोमधील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. अगदी त्याच प्रमाणे अंकुर वाढवे या कलाकारावरही रसिक भरभरून प्रेम करतात. याच शोने अंकुरला ओळख मिळवून दिली. . अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे