अबब! बॉलिवूडचा सिंघम आहे इतक्या संपत्तीचा मालक आकडा ऐकून व्हाल अवाक..
गेल्या अनेक दशकांपासून बोलक्या डोळ्यांचा नट म्हणून अभिनेता अजय देवगण याने लोकप्रियता संपादित केली आहे. त्याने आजवर त्याच्या पावरपॅक अभिनयाने चाहत्यांच्या मनात ॲक्शन हिरोची छवी निर्माण केली आहे. अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम २’ चित्रपटाची प्रेक्षक प्रतिक्षा करत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
दरम्यान, अजयबाबत इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येत आहेत. त्यात त्या दोघांची नेटवर्थ किती आहे हे देखील सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. तुम्हाला माहित आहे का? त्याची एकूण संपत्ती किती आहे? जाणून घ्या अजय देवगणची संपत्ती किती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजयची एकूण संपत्ती ही ३० मिलिनय डॉलर्स ते ५५ मिलियन डॉलर्स म्हणजेच इंडीयन रिपोर्ट्सनुसार २४४ कोटी ते ४४७ कोटी रुपये इतकी आहे. अजयने अनेक गोष्टींमध्ये गुंतवणुक केली आहे. महागड्या गाड्या, अॅन्डॉर्समेंट्स, हाय-एंड प्रॉपर्टी, जाहिराती आणि चित्रपटांसाठी मानधन. अजय हा बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा अभिनेता आहे. अजय एका चित्रपटासाठी ६०-१३० कोटी रुपये इतके मानधन घेतो.
अजयनं नुकताच प्रदर्शित झालेला ‘दृश्यम २’ साठी त्यानं अंदाजे ५० कोटी रुपये दिले. मात्र त्याला या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले याचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अजय देवगन फिल्म्स नावाचे त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे.
अजय केवळ चित्रपटांमध्ये काम करत अभिनेता म्हणून काम करत नाही तर तो निर्माताही आहे. ज्याच्या बॅनरखाली त्यानं ‘रनवे ३४;’, ‘सिंघम’ आणि ‘टोटल धमाल’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय, २०१५ मध्ये, त्याने ‘NY VFXWAALA’ नावाने आपली VFX कंपनी देखील सुरू केली आहे. कंपनीनं ‘बाजीराव मस्तानी’, ‘तमाशा’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटांसाठी VFX तयार केले आहे. तर आता त्याच्या भोला चित्रपट शूटिंग सुरू आहे.
विमल पान मसाला, व्हर्लपूल, बॅगपायपर आणि हजमोला या ब्रँड्सचा तो ब्रँड अंबेसेडर आहे आणि या ब्रँड्सच्या तो जाहिराती करतो, त्यातूनही त्याला चांगले मानधन मिळते. अजयच्या प्रॉपर्टीमध्ये सुमारे ७ कोटी रुपयांची रॉल्स रॉयस, ऑडी ए5 स्पोर्टब्लॅक, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज एस-क्लास, ऑडी क्यू-७ या लक्झरी कार, ८४ कोटी रुपयांचे खासगी जेट आणि जुहूमधील जवळपास ३० कोटी रुपयांचे शिवशक्ती घर यांचा समावेश आहे.