दुखद बातमी..! बॉलीवूड अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे झाले निधन….कलाकारांनी वाहिले श्रद्धांजली…
मित्रहो कलाकार हे आपल्या कलेने खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत असतात. त्यांच्या अंगातील गुण आणि त्यांची अप्रतिम कला नेहमीच रसिकांना आकर्षित करत असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.त्यातीलच सर्व कलाकार खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. असेच एक अभिनेते ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये भरपूर ओळख मिळवली आहे. तेच मिथिलेश चतुर्वेदी यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने सोशल मीडियावर देखील शोककळा पसरली असून अनेक बॉलीवूड कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी आजवर अनेक चित्रपटात आपली कामगिरी दाखवली आहे, फिल्म “गदर एक प्रेम कथा” तसेच सत्या, अशोका ,ताल, बंटी और बबली रेडी यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे मात्र “कोई मिल गया” या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाला एक निराळेच वळण मिळवून दिले आहे” हा चित्रपट आजही लोक खूप आवडीने आणि मनापासून पाहतात. त्या चित्रपटाचा आनंद घेतात. चित्रपटातील प्रत्येक भूमिका खूपच लोकप्रिय आणि आकर्षक आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात मिथिलेश चतुर्वेदी यांनी खूपच सुंदर भूमिका बजावली आहे. अशा निरनिराळ्या चित्रपटातून पडद्यावर गाजलेले मिथिलेश चतुर्वेदी यांचे आता निधन झाले आहे.
View this post on Instagram
३ ऑगस्ट च्या संध्याकाळी मिथिलेश चतुर्वेदी यांनी जगाचा निरोप घेतला, लखनऊ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयाचा होत असलेला त्रास त्यांना असह्य वेदना देत होत्या. रिपोर्टनुसार मिळालेल्या माहिती मधून कळले आहे की मिथिलेश यांना हार्ट अटॅक आला होता, उपचारासाठी ते आपल्या होमटाऊन मध्ये शिफ्ट झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार दुखी झालेले आहेत. मिथिलेश यांनी आजवर अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या सोबत काम केले आहे. अभिनेते सनी देओल, अभिनेते शाहरुख खान, सलमान खान, तसेच सर्वात गाजलेला चित्रपट “कोई मिल गया” मध्ये त्यांनी ऋतिक रोशन सोबत काम केले आहे.
कोई मिल गया चित्रपटात मिथिलेश यांनी एका टीचर चे काम केले होते. जो टीचर ऋतिक रोशन ला अपमानित करून क्लासच्या बाहेर काढतो आणि आपल्या बापाकडून कॉम्प्युटर शिकून येण्यास सांगतो, चित्रपटातील हा सिन अतिशय भावनिक वाटतो. यामध्ये मिथिलेश यांनी निगेटिव्ह कॅरेक्टर जरी पार पाडले असले तरी त्यांची ही भूमिका अत्यंत लोकप्रिय आणि रसिकांच्या पसंतीस पात्र उतरली आहे. काही दिवसांपूर्वी चतुर्वेदी यांना “टल्ली जोडी” या वेब सिरीज मध्ये काम मिळाले होते, या सिरीज मध्ये त्यांच्यासोबत मानिनी डे ही पाहायला मिळणार होती. त्यांच्या नव्या भूमिकेला पाहण्यासाठी चाहते मात्र खूप उत्सुक होते.
आजवर त्यांनी अनेक भूमिकांना पडद्यावर झळकवले आहे. त्यांच्या अभिनयातील आपुलकी तसेच प्रेम जिव्हाळा नेहमीच रसिकांना भावला आहे आणि यापुढे देखील त्यांच्या भूमिका पाहण्यासाठी रसिक उत्सुक होतेच मात्र त्यांनी जगाचा निरोप घेत सर्वांनाच थक्क केले आहे. त्यांच्या भूमिकेतून त्यांची आठवण नेहमीच सर्वांना राहील. आपल्या कलेच्या जोरावर अप्रतिम लोकप्रियता मिळवणारा अभिनेता गमावल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे मात्र तरीही त्यांच्या आठवणी जपून ठेवल्या जातील,नेहमीच त्यांच्या भूमिकांना उजाळा मिळत राहो ही सदिच्छा ! आमच्याकडूनही मिथिलेश चतुर्वेदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!