बोल्ड आणि ब्युटीफूल तेजस्विनी अजूनही सिंगल कशी ? बिग बॉसच्या घरी केला खुलासा.. उत्तर ऐकून व्हाल थक्क

कलर्स मराठीवर आता बिग बॉसच्या घरातील खेळाला रंगत चढली आहे. दरम्यान घरातील पहिलाच आठवडा चांगलाच रंगला. त्यानंतर चावडीवर महेश मांजरेकरांनी देखील संपूर्ण आठवडाभरात झालेल्या घडामोडींची चांगलीच शाळा घेतली.

त्यानंतर मात्र या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरातील चित्र काहीसं बदललेलं पाहायला मिळणार आहे. चावडीवर होस्ट महेश मांजेकर यांच्याकडून मिळालेल्या टीप्स घरातील सदस्य फॉलो करताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात केवळ भांडणं, वाद विवाद इतकंच होत नाही तर या घरात अनेकांबरोबर नव्या गोष्टी घडतात. नवी मित्र नवी नाती निर्माण होत आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी आणि अमृतामध्ये झालेल्या चर्चेवर नेटकऱ्यांची चर्चा रंगली आहे.

तर ही चर्चा होती लग्नावरून. “तू अजून लग्न का केलं नाही”, या प्रश्नावर तेजस्विनीनं अमृताला दिलेल्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आणि याचे व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करतेय. मकरंद अनासपुरे सह बाप रे बाप डोक्याला ताप चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. यासोबतच तिने मालिकांमध्ये काम केलं आहे. झी मराठीवरील नुकतीच ती झी मराठीवरील देवमाणूस 2मध्ये मालिकेत दिसली होती. देवमाणूसमध्ये तेजस्विनीनं साकारलेली आमदार बाई प्रेक्षकांना चांगलीच आवडली. बोल्ड आणि ब्युटीफूल असणारी तेजस्विनी आजही सिंगल आहे. ती सिंगल का? लग्न का केलं नाही यावर रंगलेल्या चर्चांवर तेजस्विनीनं या चर्चेतून खुलासा केलाय.

चावडीनंतर घरामध्ये अमृता आणि तेजस्विनीमध्ये लग्नाविषयी चर्चा सुरू होते. तेव्हा “माझ्या भावाने २१ व्या वर्षी लग्न केलं”, असं तेजस्विनी म्हणते. त्यावर अमृतानं तिला वाचारलं “तू का नाही लग्न केलंस ?”, अमृताच्या प्रश्नाचं उत्तर देत तेजस्विनी अमृताला म्हणाली, “असं कोणी भेटलं नाही, आणि आपल्याला ज्याच्यासोबत करायचं आहे त्याला नसतं करायचं आपल्यासोबत”.

तेजस्विनीच्या या उत्तरावर अमृताने तिला पुन्हा प्रश्न विचारला. ती म्हणाली, “तुला या इंडस्ट्रीमध्ये करायचे आहे कि नाही ?”, त्यावर तेजस्विनी म्हणाली, “इंडस्ट्री मध्ये कोण आहे ? कोणी आहे का हॅन्ड्सम, कोणीच नाही … मला तरी नाही आवडत इंडस्ट्रीमधलं…

तेजस्विनी आणि अमृता यांच्यातील हा संवाद प्रेक्षकांना फारच आवडला आहे. यासोबतच बिग बॉसच्या घरी मेघा घाडगेची लावणी, किरण मानेंचा स्वयंपाक देखील पाहायला मिळाला आहे. सोबत घरातील योगेश हा पहिल्यांदा जेलमध्ये जाणार आहे. त्यामुळे शो आगामी भाग पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप