हॉटनेसने घायाळ करणाऱ्या समृध्दीने घेतली बिग बॉसमध्ये एंट्री ..अशी आहे तिची ख्याती

चटर पटर बस झाली भाऊ म्हणत आता बिग बॉसचा चौथा सिझनचे अगदी दमदार पद्धतीने ग्रँड प्रीमियर झाले. दरम्यान आता बिग बॉसच्या घरी कोण कोण राहणार याचा उलगडा झाला आहे. यामध्ये तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजेशिर्के, किरण माने, यांच्यासोबत आणखी एक नाव समोर आलंय ते म्हणजे समृद्धी जाधवचं.

मूळची पुण्याची असणाऱ्या समृद्धीने स्प्लिट्सव्हिलामधून लोकप्रियता संपादित केली आहे. यासोबतच ती सोशल मीडिया वरील प्रसिद्ध इन्फ्लयुएन्सर देखील आहे. तिचे हॉट लूक्स सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत असतात. त्यामुळे आता ती बिग बॉस मराठी ४ च्या घरातील वातावरण गरम करण्यासाठी सज्ज झालीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samruddhi Jadhav (@samruddhi.j)

घोडेस्वारी पासून ते स्विमिंग हिला सगळ काही येत अशी ओळख करून देत कलर्स मराठी वाहिनीने ऑफिषीयल इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा हॉट व्हिडियो शेयर केला होता. समृद्धीच्या येण्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात गरमी वाढणार यात काही शंकाच नाही. आता ती बिग बॉसमध्ये काय जादू दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. समृद्धी जाधव, हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे कारण ती Splitsvilla X3 चा भाग होती.

अत्यंत बोल्ड अंदाजात समृद्धीनं बिग बॉसमध्ये आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ करणारा डान्स करत धडाक्यात एन्ट्री घेतली आहे. आता घरात ती कुणाकुणाला घायाळ करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

समृद्धीला नृत्य आणि गाण्याची आवड आहे. ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. ती राष्ट्रीय स्तरावरील स्केटर आहे. समृद्धीला घोडेस्वारी, स्केटिंग, जिम्नॅस्टिक, नृत्य, गायन इत्यादींमध्ये रस आहे. समृद्धीने मॉडेल म्हणून काम केले आणि विविध लोकप्रिय ब्रँडसाठी रॅम्प वॉकही केला आहे. याशिवाय समृद्धी २०२१ मध्ये स्प्लिट्सविला X3 च्या स्पर्धकांपैकी एक होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samruddhi Jadhav (@samruddhi.j)

समृद्धी मूळची पुणे, महाराष्ट्राची आहे. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली. यासोबतच तिने फॅशन कम्युनिकेशनची पदवी मिळवली आणि त्यानंतर मुंबईत मॉडेल म्हणून आपले करिअर सुरू केले.

दरम्यान, बिग बॉस मराठी ४ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बिग बॉस मराठी ४ चे पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. आता येत्या १०० दिवसात महेश मांजरेकर यांची कशी शाळा घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.यंदाचा ग्रँड प्रीमियर पाहता हा सिझन नक्कीच भन्नाट असणार यात तिळमात्र शंका नाही.

 

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप