बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाच्या पहिल्या आठवड्यापासूनच स्पर्धकांमध्ये भांडण, राडे होण्यास सुरुवात झाली. शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी यावरून स्पर्धकांची शाळाही घेतली. या घरामध्ये होणारं भांडण आणि स्पर्धकांचा राग एका वेगळ्याच थराला पोहोचतो हे प्रेक्षकांनी याआधीही पाहिलं आहे.
असंच काहीसं अपूर्वा नेमळेकरच्या बाबतीतही घडताना दिसत आहे. पण सध्या घरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या घरात वेगळंच चित्र बघायला मिळणार आहे. नेहमी वादात अडकणारी अपूर्वा आज चक्क रुचिराची मिमीक्री करून हसवताना दिसणार आहे तर नेहमी आनंदी असणारी यशश्री आज तावतावाने भांडताना दिसणार आहे.
तर झालं आहे असं की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत. या भागात रोहित अपूर्वला सांगतो, ‘हिला कधी पण काहीही सुचतं, तू हिला चॅलेंज करू शकत नाही. हीच सगळं अपरंपार असतं. तर अपूर्वान रुचिरा समोर माघार घेतल्याचं कबूल केलं. तर रोहित म्हणाला, ‘तिला भांडताना बघायचं “एक मिनिटं” मला बोलायचं आहे. त्यावर अपूर्वा म्हणाली.. नाही तिचं असं असतं “आता माझं ऐकायचं..’ असे म्हणत रुचिराची चांगलीच खिल्ली उडवतात. या आनंदांच्या क्षणासोबत आज राडेही होणार आहेत. तर ‘हि पोरगी एवढी खोटारडी आहे’ म्हणत अमृता धोंगडे यशश्री मसुरकर वर बरसताना दिसून येणार आहे.
View this post on Instagram
अमृता धोंगडे आणि याश्री मसुरकर यांच्यामध्ये चहा बनवण्यावरून राडा होणार आहे. कोण खरं आणि कोण खोटं बोलतं आहे ते कळेलच. पण, सकाळची सुरुवात यांच्यातील खंडाजंगीने होणार. यशश्रीचे म्हणणे आहे, “मी तेजुला सांगितलं मला सकाळचा चहा लागतो, माझी कामं झाली आहेत तर तू करून देशील का? त्यावर तेजस्विनी ठीक आहे म्हणाली. मी अमृताला बोलले.. मी तेजुला सांगितलं आहे चहा बनवायला, कारण सकाळचं जरा,’ त्याच्यावरूनच वाद सुरू झाला. यशश्री अमृताला म्हणाली, जरा बाहेर जाऊन बघ तू … आणि हे ऐकताच अमृता म्हणाली, “आई शप्पथ, माझं जेवण समोर आहे आयुष्यात मी खोटं नाही बोलणार, सॅम हि पोरगी एवढी खोटारडी आहे, ही काय बोली मी तुला सांगू..” आता अमृता नेमकं काय सांगणार, आणि कसा वाद रंगणार.. हे आजच्या भागात कळेल.