चटर पटर बस झाली भाऊ म्हणत आता महेश मांजरेकर घेणार स्पर्धकांची शाळा.. बिग बॉस ४ चे टायटल साँग झाले व्हायरल…

टिव्ही इंडस्ट्री मध्ये सर्वात जास्त वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस आता पुन्हा एकदा त्याच जोषात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अगदी त्याच जोशात सलमान खान स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. दरम्यान चौथ्या सीझनची घोषणा झाल्यापासून साऱ्यांनाच या नव्या सीझनची खूपच उत्सुकता आहे. या शोमध्ये नक्की कोण सहभागी होणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सीझनची थीमही एकदम हटके ठेवण्यात आली आहे.

स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकही बिग बॉसची आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या घरात येणारे एकाहून एक सरस सेलिब्रिटी, अतरंगी कलाकार त्यांची होणारी भांडणं, रुसवे, वाद, प्रेम आणि सर्वात रंजक टास्कस यामुळे हा शो पाहण्यात प्रेक्षकांना चांगलाच इंन्ट्रेस्ट होतो. बिग बॉस घर हादेखील आकर्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यावेळी मात्र शोप्रमाणे नव्या घरासह या सिझनचं टायटल साँगही तितकंच चर्चेत आहे. दरम्यान, हे साँग नुकतंच रिलीज झालं आहे.

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांप्रमाणेच टायटल साँगही हटके आहे. काही तासांपूर्वीच हे टायटल साँग रिलीज करण्यात आलं. यंदा बिग बॉसची थीम ‘ऑल इज वेल’ आहे. महेश मांजरेकरांनी हे टायटल साँग त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेलं आहे. महेश मांजरेकर यांनी वेधक कॅपशन देत म्हंटले आहे की , ” मनोरंजनाचा खजिना खुलणार, 100 दिवसांचा खेळ रंगणार…”BIGG BOSS मराठी” यंदा ALL IS WELL… हे सांगणारं टायटल साँग… खास तुमच्यासाठी!”BIGG BOSS मराठी” Grand Premiere, 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

याआधीच्या 3 सीझनपेक्षा यंदाचं टायटल साँग खूपच हटके आहे. काहीवेळातच हे गाणे व्हायरल देखील खले आहे. “चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ” असं म्हणत महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घ्यायला तयार झालेले आहेत. प्रेक्षकही या टायटल साँगवर एकाहून एक जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. सीझन 3 चा बेस्ट प्लेअर असलेल्या उत्कर्ष शिंदेनं कमेंट करत, ‘ये बात हंगामा सुरू’, असं म्हटलं आहे. तर एका यूजरने , ‘या राड्याची खूप वाट पाहिली’, असं म्हटलंय. दुसऱ्या युझरनं ‘हा सीझन हिंदीला टक्कर देईल’, असं म्हटलं आहे. एकूणंच काय तर प्रेक्षक बिग बॉस मराठी सीझन ४ ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप