धक्कादायक; अभिनेत्री नेहा पेंडसेवर कोसळला दुःखाचा डोंगर

मित्रहो सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी चकित करणारे ऐकायला मिळत असते, अनेक घटना वरचेवर समोर येत असतात. नुकताच एक बातमी सोशल मीडियावरील वातावरण निराशाजनक करत आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, नेहाचा खास मित्र आणि सहकलाकार दीपेश भान आकस्मात निधन झाले आहे. भरपूर लोक त्यांच्या अतरंगी भूमिकेचे चाहते आहेत, सोबतच त्यांचे देखील चाहते आहेत. दीपेश भान हे एक उत्कृष्ट अभिनेता आहेत, पडद्यावर त्यांच्या भूमिकांनी रसिकांना प्रचंड मनोरंजित केले आहे.

 

“भाभी जी घर पर है” या लोकप्रिय मालिकेतून दीपेश घराघरात पोहचले आहेत. त्यांचे २३ जुलै रोजी निधन झाले आहे, असे अचानक त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. दीपेश भान यांच्या सोबत अभिनेत्री नेहा पेंडसेनं “भाभी जी घर पर है” या मालिकेत काम केलं होतं. दीपेश अचानक जाण्याने तिलाही आश्चर्य वाटत आहे, एका डिजिटल वृत्तपत्राला प्रतिक्रिया देत असताना नेहा सांगते “हे ऐकून मला धक्का बसला आहे, कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाहीये.

मी सध्या मुंबईत नाही आणि मी लवकरच दीपेश भान यांच्या घरी जाणार आहे. मी मुंबईत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जात आहे. मी सध्या पुण्यात आहे. याची माहिती मिळताच मी मुंबईला जाण्याच्या तयारीत आहे. भाभी जी घर पर है, आणि मे आय कम इन मॅडम यांसारख्या शोमध्ये मी दीपेश भान सोबत काम केलं असल्याने मी दीपेशला कधीही विसरू शकणार नाही. खरं सांगायचं तर दीपेश भान खूप फिट्ट व्यक्ती होता.शेवटी काय झालं तेच मला समजत नाही. हे सर्व कसं घडलं.”, मित्रहो दीपेश भान यांच्या अचानक झालेल्या निधनाने अनेक कलाकार निराश आहेत.

“भाभी जी घर पर है” हा शो मोठ्या प्रमाणावर गाजला आहे. याचे अनेक लोक चाहते आहेत, ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरली आहे. मालिकेचा टीआरपी आधीपासूनच टॉप लिस्ट मध्ये आहे. मालिकेचे कथानक आणि त्यातील भूमिका आगळ्यावेगळ्या रुपात सादर झाल्या आहेत, लोकांच्यात या मालिकेची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. सोशल मीडियावर देखील याची खुप चर्चा होत असते, तसेच यातील कलाकार सुद्धा तितकेच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले आहेत. या कलाकारांच्या खाजगी जीवनातील काही खास गोष्टी देखील चर्चेत राहिल्या आहेत.

यातूनच लोकप्रिय झालेले दीपेश भान यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने अनेकांच्यावर वाईट वेळ आली आहे, खूपसे चाहते दुःखी झाले आहेत. त्यांना सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काहीजण कमेन्ट मध्ये आपले मन मोकळं करत त्यांच्या बद्दलच्या आठवणी सांगत आहे. माणूस जरी सोबत नसला तरीही त्याच्या आठवणी खूप साथ देतात आणि दीपेश यांच्या भूमिका नेहमीच अशा सोबत राहतील व त्यांच्या अस्तित्वाला जिवंत रूप देत राहतील. आमच्या कडून देखील दीपेश भान यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Leave a Comment

Close Visit Np online