बिग बॉसच्या घरी दाखल झाली ही जोडी काय असेल त्यांची नवी खेळी?

0

बिग बॉस मराठीच्या चौथा सिझन चा ग्रँड प्रीमियर मोठ्या दिमाखात पार पडला. हटके अंदाजात शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी देखील एंट्री घेत सगळ्यांना चाट पाडले. याबरोबरच प्रत्येक स्पर्धकांची एंट्री ही तितक्याच दिमाखात झाली आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या शैलीत एंट्री घेतली. ज्यामध्ये हॉट अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड अंदाजात एंट्री घेतली जी पाहून चाहते घायाळ झाले. या सर्वांसोबतच शोमध्ये एका जोडीने एंट्री घेतली. ज्यांच्या एंट्रीने वातावरण आपोआप गरम झाले. ही जोडी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. ती आहे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि डॉ.रोहित शिंदे यांची

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी आणि प्रसिद्ध अशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या गाजलेल्या मालिकेत ‘माया’ चे पात्र साकारलेली अभिनेत्री रुचिरा जाधव दाखल झाली आहे. विशेष म्हणजे रुचिरा बिग बॉसमध्ये एकटीच दाखल झालेली नाही. तर तिनं तिच्या प्रियकरासोबत घरात एन्ट्री घेतली आहे. डॉ. रोहित शिंदे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाला आहे.

शोमध्ये आल्यानंतर महेश मांजरेकरांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमची ओळख कशी झाली. त्यावर उत्तर देत रोहित म्हणाला, ‘प्रेम करायला शोधायची गरज नसते, ते आपोआपच भेटते.’ तर पुढे रुचिरा म्हणाली, ‘मी आणि रोहितनं आम्ही एकत्र एक शूट केलं होतं. तेथे काही मित्रही ओळखीचे होते.

रुचिराने रोहितच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रेमाची कबुली दिली होती. रुचिरा आणि रोहित हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रुचिराच्या बहिणीच्या लग्नातही त्याने हजेरी लावली होती. पण त्यावेळी रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवली होती. रोहित हा पेशाने डॉक्टर आहे. रोहितला मॉडेलिंगची आवड आहे. रोहितनं ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे. रोहितनं अनेक ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे. रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. फक्त फिटनेस नाही तर त्याला भटकंती करण्याची फार हौस आहे.

रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव यांचे नाते खास आहे हे स्पष्ट होते. आता ते बिग बॉसच्या घरातही एकत्र दाखल झाले आहेत. आता त्यांची ही जोडी बिग बॉस च्या घरात कोणता नवा हंगामा करेल ?  रुचिरा आणि रोहित शो मध्ये कसा तग धरतील ? की आपलाच नवा खेळ सुरू करतील?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आगामी भागात पहायला मिळतीलच.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप