छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. दरम्यान, हा शो सध्या शोच्या होस्टसाठी चर्चेत येत आहे. मात्र या सीझनमध्ये वाहिनीला कार्यक्रमासाठी निवेदक मिळेनासा झालाय. आता नाना पाटेकर यांनीही कार्यक्रमासाठी नकार दिल्याचं म्हटलं जातंय. प्रत्येक सीझनमध्ये आपल्या स्पष्ट बोलण्याने स्पर्धकांना धारेवर धरणारे लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडतात. त्यांची स्टाईल ही प्रेक्षकांची आवडती आहे.
सोशल मीडियावर दररोज याबाबत चर्चा होताना आढळते आहे. शोचा होस्ट कोण असेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या शोच्या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करणार नसल्याचे बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, अभिनेते नाना पाटेकर यांना या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनासाठी विचारण्यात आलं होतं.पण काही कारणास्तव त्यांनी हा कार्यक्रम करण्यास नकार दिला.सध्यातरी या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन कोण करणार? हे ठरलेलं नाही.
दरम्यान, बऱ्याच वेळा अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाचं सुत्रसंचालन करणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत अनेकदा नेटकऱ्यांची चर्चा देखील झाली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबद्दल सांगायचे तर बिग बॉस मराठी 4 बद्दल अद्याप कुठेही बोललेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच बीबी मराठीचे पहिले टीझर्स शेअर करणार्या महेशने त्याच्या अधिकृत हँडलवर प्रोमो शेअर न केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.
महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करत राहणार की त्यांच्या जागी दुसरे कोणी होस्ट म्हणून काम पाहणार? याचं उत्तर बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना लवकरच कळणार आहे. शोचे निर्माते सध्या महेश मांजरेकर यांच्याशी चर्चा आणि बैठका घेत आहेत आणि पुढील तीन महिन्यांसाठी त्यांच्या तारखांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण ते त्यांच्या आगामी चित्रपटांच्या अनेक प्रकल्पांमध्ये बॉलिवूड स्टार्ससह व्यस्त आहेत.तरीही अद्याप चॅनेलकडून अधिकृत पुष्टीकरण किंवा निर्मात्यांनी अद्याप शोच्या होस्टबद्दल सादर केले नाही परंतु लवकरच प्रेक्षक आणि बिग बॉस मराठी चाहत्यांना तपशील मिळतील.