टीव्हीवरील लोकप्रिय बहुराणी दाखल होणार बिग बॉसच्या घरी… कोण आहेत या जाणून घ्या..

‘बिग बॉस’ हा छोटया पडद्यावरील सर्वात लोकप्रियरिअॅलिटी शो आहे. दरम्यान सोशल मीडियावर मराठी सिझन बाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आणि आता हिंदी सिरीज मधील १६ व्या सीझनबाबत नेटकरी चर्चेत रंगले आहेत. आता लवकरच सलमान खान हिंदी कलाकारांची शाळा घेताना दिसून येणारं आहे. गेल्या काही सिझनची लोकप्रियता पाहता हा सिझन भन्नाट असेल यात तीळमात्रही शंका नाही. त्यामुळे यावेळी शोमध्ये कोणतेकोणते कलाकार भाग घेणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

कलर्स चॅनलवर हा शो २ ऑक्टोबर रोजी हा शो ऑन एअर होणार आहे. शो ऑन एअर होण्यास काहीच दिवस बाकी असताना आता सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमो मध्ये स्पष्ट होत आहे की यंदा बिग बॉसमध्ये टीव्हीवरील दोन लोकप्रिय बहुराणी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहुची भूमिका साकारणारी जिया माणेक आणि अभिनेत्री रिद्धीमा पंडित यांना यंदाच्या बिग बॉस सीझनसाठी निर्मात्यांनी ऑफर पाठवली आहे. तर अभिनेत्री रिद्धीमा पंडित बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे, पण ती शोमध्ये जास्त काळ टिकू शकली नसती. बिग बॉस ओटीटीपूर्वी रिद्धीमा ‘हमारी बहु रजनीकांत’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तर, जियाने लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया सोबतच सब टिव्हीवरील जीनी और जुजू मालिकेत काम केले आहे. दरम्यान, या दोघींना निर्मात्यांनी ऑफर पाठवली आहे, परंतु त्यांनी ती स्वीकारली आहे की नाही आणि या दोघी बिग बॉसमध्ये दिसणार की नाही, यावर अजूनही कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

सध्या रिद्धीमा आणि जिया दोघीही सध्या स्क्रीनवर ॲक्टीव्ह नाहीत. साथ निभाना साथिया सोडल्यानंतर बराच काळ जिया माणेक पडद्यापासून दूर होती. नंतर ती ‘तेरा मेरा साथ रहे’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये येऊ शकली नाही, तसेच प्रेक्षकांनाही ती फार पसंतीस पडली नाही, त्यामुळे निर्मात्यांनी ती मालिका बंद केली होती. बराच काळ टीव्हीपासून दूर असलेल्या या दोन्ही अभिनेत्रींचे चाहते मात्र त्या बिग बॉसमध्ये दिसणार असल्याच्या बातम्यांनी आनंदी दिसत आहेत. परंतु दोघींनी याबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही, तसेच निर्मात्यांनीही त्यांच्या नावाबद्दल स्पष्टता केलेली नाही.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप