३० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत भरत जाधव यांनी शेयर केला खास फोटो..
सोशल मीडिया हे अलीकडे केवळ एकमेकांना संपर्क करण्याचेच नाहीतर दैनंदिन आयुष्यात असणारे महत्वाचे क्षण शेयर करता येण्याचे साधन बनले आहे. दरम्यान, अनेक सेलिब्रिटी दररोज आपले अपडेट्स त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर करत असतात.ज्यामुळे चाहते त्यांच्याशी जोडले जातात. आणि सोशल मीडियावर अनेक ट्रेंड्स चालू असतात जे काही वेळातच व्हायरल देखील होतात.
दरम्यान जेव्हा पण सेलिब्रिटींच्या आठवणींना उजाळा देतात, तेव्हा चाहत्यांसाठी काही खास आणि रंजक असे किस्से समोर येतात. सृष्टीतील गाजलेले आणि नावाजलेले नाव म्हणजे अभिनेता भरत जाधव. त्यांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तब्बल ३० वर्ष जुना फोटो शेअर करत आठवणीच्या कप्प्यातील एका किस्सयाला देखील आठवले आहे.
अभिनेता भरत जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपले वेगवेगळे फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अधून मधून जुन्या आठवणींच्या पेटीतील काही खास किस्से देखील शेअर करत असतात. आणि आता महारष्ट्राची लोकधारा दरम्यानचा एका फोटो त्यांनी शेयर केला आहे.
या फोटोमध्ये, मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजविलेले काही दिग्ग्ज कलाकार आहेत. “सर्वसाधारण वाटणारा हा फोटो खुप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीच्या आठवणींचा. तीन जिवलग मित्र, तीन वेगवेगळ्या विंडो सीट जवळ बसलेले तुम्हाला या फोटोमध्ये बघायला मिळतील.
View this post on Instagram
त्यामुळे त्यांना ओळखणे चाहत्यांना चांगलेच अवघड जात आहे. हा फोटो सो शल मी डियावर शे अर करताच, चाहत्यांनी त्यावर प्रश्नांचा मारा सुरु केला. अनेकांनी कमेंट करत कोण कोण या फो टोमध्ये आहेत याचं उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केला. एका युजरने विचारले फोटोमध्ये दिसणारे ते दादूसच आहेत का?’
त्यावर त्याला उत्तर देत भरत जाधव म्हणाले, ‘होय, शेवटच्या सीट वर मध्यभागी महाराष्ट्राचे लाडके दादूस बसले आहेत..!’ ३० वर्षांपूर्वीच्या दादूसला ओळखणे कठीणच ठरत आहे. मात्र त्यांच्या सच्च्या चाहत्याने त्यांना ओळखलेच. ‘कमाल दिवस’ असं म्हणत अंकुश चौधरीने या फोटोवर क मेंट केली आहे.हा फो टो बघून अंकुश चौधरींच्या आठवणी देखील ताज्या झाल्या. दरम्यान फो टोमध्ये, भरत जाधव यांनी उल्लेख केलेले तीन कलाकार कोण, याबद्दल क मेंट बॉक्समध्ये चांगलीच चढाओढ सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे या तिघांचा उल्लेख, भरत जाधव यांनी केला आहे.